Satara : बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्र बसून पराभवाची कारणे शोधणार : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai शंभूराज देसाई म्हणाले, सत्यजित तांबे यांना पाडण्याचा महाविकास आघाडीने खुप प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama

Satara News : अमरावती Amravati व नागपूर Nagpur येथील निवडणुकीत आम्हाला अपयश आले आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना व भाजप BJP आम्ही एकत्र बसून विचार करु. प्रचारात ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या आगामी काळात आम्ही भरुन काढू, असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषदेत आढावा बैठकीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीच्या निकालावर भाष्य केले. शंभूराज देसाई म्हणाले, सत्यजित तांबे यांना पाडण्याचा महाविकास आघाडीने खुप प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही.

अमरावतीत आम्हाला अपयश आले. त्याचे कारण शोधून काढून. तसेच नागपूरची जागा आम्ही शिक्षक संघटनांसाठी सोडली होती. तिथेही अपयश आले. याचा वरिष्ठ पातळीवर आम्ही विचार करुन त्रुटी राहिल्या असतील, त्या आगामी काळात भरुन काढू. बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे नेते एकत्र बसून पराभवाची कारणे शोधून काढू.

Shambhuraj Desai
Satara : देशाला सशक्त, समृध्द करणारा अर्थसंकल्प : उदयनराजे

जिल्ह्यात अवैध दारु व्यावसाय वाढत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यात कुठेही अवैध दारु व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. गृहविभाग व उत्पादन शुल्क विभाग संयुक्त कारवाई मोठ्या प्रमाणात करतात. पण अधिकाऱ्यांची पाठ फिरल की पुन्हा अवैध दारु व्यवसाय सुरु होतात. असे ज्या ठिकाणी होत असेल तर अशा अवैध दारु विक्रेत्यांवर मोक्क लावता येईल का, याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Shambhuraj Desai
Koyana Dam News: कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटणार; शंभूराज देसाईंवर दिली जबाबदारी..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com