ajit pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : येरवड्यातील पोलिसांच्या जागेचा वाद; अखेर अजितदादांनी जाहीरपणे सांगून टाकले...

Ajit Pawar On Yerwada Police Land Controversy : माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली.

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : येरवड्याच्या पोलिसांच्या जागेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. आता पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात अजितदादांनी या प्रकारणी सांगूनच टाकले. पुण्यातील येरवडा येथील ती तीन एकर जागा दिली, तर पंधरा कोटींची कामे करून मिळणार होते, म्हणून मी म्हटले होते, फायद्याचे असेल तर द्या. त्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, फायद्याचं नाही. मग मी म्हटलं सोडा, माझं तेवढंच बोलणं झालं होतं. त्यापेक्षा माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डीत दिले.

माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात पुणे पोलिसांच्या येरवडा येथील तीन एकर जमिनीच्या लिलावप्रकरणी विभागीय आयुक्त आणि तत्कालीन पालकमंत्र्यावर आक्षेप नोंदविले होते. पालकमंत्र्यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता. मात्र, आपण त्याला नकार दिला, असा गौप्यस्फोट बोरवणकर यांनी चार दिवसांपूर्वी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा प्रकारच्या जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही. माझा काहीही संबंध नाही, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनीही बोरवणकर यांचा मुद्दा खोडून काढला होता. अजित पवार यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे बंड यांनी सांगितले. त्यानंतर आज अजित पवार पिंपरी-चिंचवडला आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात येरवड्याच्या पोलिसांच्या जागेप्रश्नी अखेर अजितदादांनी आपली भूमिका जाहीरपणे सांगून टाकली.

माझा एवढाच संबंध!

अजित पवार म्हणाले, माझा काहीही संबंध नसतानाही तीन चार दिवसांपासून बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यात माझा दुरान्वये संबंध नाही. मी कधीही चुकीचे काम करत नाही. जमीन देण्यासंर्भात आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्रालयाकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती त्यावेळी नियुक्त केली होती. त्या मॅडमच्या पदाच्याबरोबर पद असलेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत मलाही माहिती दिली होती. गृहमंत्रालयाचा प्रस्ताव होता. मी माहिती घेतली. त्यावेळी मला सांगितलं होतं, की ती तीन एकर जागा दिली तर पंधरा कोटींची कामे करून मिळणार आहेत. त्यावेळी मी म्हटलं होतं फायद्याचे असेल तर द्या. त्यावर मॅडम म्हणाल्या होत्या, फायद्याचं नाही, मग मी म्हटलं सोडा. माझं तेवढंच बोलणे झाले होते. कामे अडल्यानंतर अधिकारी आपण बोला, असे अधिकारी सुचवितात. म्हणून मी तेवढंच बोललो होतो. त्यापेक्षा माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही. माध्यमं उगाच ' ध' चा ' मा' करीत आहेत, असे अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT