Sharad Pawar Big Decision : माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय

Madha Loksabha : त्या बैठकीत पवारांनी या विषयावर बोलणे टाळले होते. मात्र, आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत शरद पवारांनी आपली भूमका स्पष्ट केली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. १९) मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे.

त्यात दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलताना ‘मी लोकसभेची निवडणूक लढविणार नाही,’ असे पवारांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar's big decision regarding Madha Lok Sabha constituency)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. त्यात माढा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलताना सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील नेतेमंडळींनी ‘पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी’, अशी गळ घातली होती.

त्या बैठकीत पवारांनी या विषयावर बोलणे टाळले होते. मात्र, आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत शरद पवारांनी आपली भूमका स्पष्ट केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या तंबीनंतर नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणावर बोलणे टाळले

लोकसभेची निवडणूक मी लढवणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करून संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी राज्यासह देशभरातही दौरे करण्याचा निर्धार पवार यांनी याच बैठकीत बोलून दाखवला.

माढ्यातून शरद पवार यांनी २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पवारांना ५ लाख ३० हजार ५९६ मते मिळाली हाेती. त्याची टक्केवारी ५७.७१ इतकी होती. त्यांनी ही निवडणूक तीन लाख १४ हजार मतांनी जिंकली होती.

त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे २५ हजार ३४४ मतांनी जिंकले होते. मागच्या निवडणुकीत तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जिंकले होते. त्यामुळे माढ्यातून पवारांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रहाची मागणी आढावा बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, त्यास पवारांनी नकार दिला आहे.

Sharad Pawar
Nilanga Politics News : सरकार आपले तरी लातूरला पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; निलंगेकरांनी रणशिंग फुंकले

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे या मागील आठ दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळीही माळशिरस तालुक्यातील पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही ‘पवारांनी माढ्यातून लढावं,’ अशी मागणी केली होती. मात्र, त्यास सुप्रिया सुळे यांनी नकार देताना माढ्यातून स्थानिक नेतृत्वालाच संधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

Sharad Pawar
Sanjay Raut News : ललित पाटील मोहरा, हिंमत असेल तर दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत; राऊतांचं फडणवीसांना आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com