Sharad Pawar's visit to Ajit Pawar's funeral site for memorial planning Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकाबाबत शरद पवारांनी व्यक्त केलं आश्चर्य! म्हणाले,"....तरीही मला माहिती नाही"

Ajit Pawar Memorial: अजित पवार अन् राष्ट्रवादीचं विलीनीकरण सोडून शरद पवारांची पहिल्यांदाच इतर राजकीय विषयांवर प्रतिक्रिया

मिलींद संगई

Ajit Pawar Memorial: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सध्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या विलिनिकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे इतर नेते सातत्यानं यावर चर्चा करत आहेत. पण आज पहिल्यांदाच शरद पवारांनी या विषयाव्यतिरिक्त विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ५८ वर्षांनंतर खंडीत झालेली परंपराही सांगितली. त्याचबरोबर अजित पवारांच्या स्मारकाबाबतही शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

बारामतीत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, "मी विधानसभा, लोकसभा व राज्यसभेत गेल्या 58 वर्षांपासून कार्यरत आहे. या कालखंडात अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर होणार आहे, त्या दिवशी मी कधीच गैरहजर राहिलो नाही. मात्र, दुर्देवाने अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे यंदा उपस्थित राहता आलं नाही. सभागृहात उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकता आलं नाही. अजित पवार यांच्या स्मारकाबाबत मी वृत्तपत्रातूनच वाचलं. ज्या संस्थेमध्ये स्मारकाच्या जागेची चर्चा सुरु आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष मी असल्याने मला तरी ही बाब माहिती असायला हवी. पण तशी काहीही चर्चाच झाली नाही, आम्ही लोक पुढील काळात एकत्र बसून त्याबाबत चर्चा करु, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

अमेरिकेसोबत भारताच्या करारावर भाष्य

नवीन कर लावणे सरकारने टाळल्याने सामान्य माणसाला यामुळे दिलासा मिळणार आहे. विकासाला अधिक चालना मिळेल या दृष्टीने काही ठोस पावले उचलण्याची आणखी आवश्यकता होती. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक दोन गोष्टींची मला चिंता वाटतेय. या नवीन कराराचे स्वच्छ चित्र आणखी दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल. या करारामध्ये अमेरिकेतील शेतीमाल भारतात येणार आहे, ही बाब भारतीय शेतक-यांसाठी काळजी करण्यासारखी आहे. अमेरिका शक्तीशाली देश आहे, त्यामुळे अमेरिकेतील कृषीमाल भारतात आला तर भारतीय शेतक-यापुढे यामुळे अडचणी निर्माण होऊ नयेत हीच काळजी मला वाटत आहे.

राहुल गांधी नरवणे प्रकरणावरही बोलले

राहुल गांधी यांनी संसदेत माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्याने गदारोळ झाला, त्याबाबत विचारता शरद पवार म्हणाले, "नरवणे लष्करप्रमुख होते, त्यांनी काही लिखाण केले असेल आणि त्याचा उल्लेख विरोधी पक्षनेता करत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना ही संधी द्यायला हवी होती. माजी लष्करप्रमुखांनी काही लिहून ठेवले आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे, ही चर्चा झाली असती तर लोकांसमोर वास्तव चित्र आलं असतं, अशा शब्दांत संसदेत सध्या गाजत असलेल्या मुद्द्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT