Pune, 22 Apr 2025: सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
"आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान शेती उपयोगी आहे. आमचा रस शेतीत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने शेतीसाठी होऊ शकतो याबाबतची माहिती जाणून घेत आहोत. जमिनीचा पोत राखण, खताची गरज ओळखणे हे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करावा, अशी आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या वतीने आणखी पाच पिकांसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर जाहीर करण्यात आला आहेत याचा आम्हाला आनंद आहे," असे शरद पवार म्हणाले. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील पाणी संकटावर बोलताना शरद पवार म्हणाले, "राज्यातील पाणीसाठा हा 38 टक्के आहे, असं तुम्ही म्हणत असाल तरी माझ्या माहितीनुसार सध्या राज्यामध्ये 43 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. याच्या अगोदर देखील असं झालं होतं ते काय आजच झालं अस नाही. माझी खात्री आहे शेतकरी सुद्धा पाण्याचा जपून वापर करतील. मे आणि जून महिना दोन महिने काढायचे आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पावले टाकावे लागतील,"
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यावर शरद पवार म्हणाले, "हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. याची माहिती मला नाही. मी काही त्यांच्याशी बोललो नाही. त्यावर मी कसं भाष्य करू,"
गेले पंधरा दिवसांमध्ये अजित पवारांसोबत एकत्रित अशा तीन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात मनोमिलन होणार असल्याचं चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारला असता शरद पवार म्हणाले, "जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. तुम्ही जो उसाच्या संदर्भात उत्पादन वाढीचा प्रश्न काढला त्याच्यावर आम्ही गेले वर्षभर काम करीत आहोत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शेवटी सरकार आलं पाहिजे, सरकारमध्ये सहकार प्रतिनिधीशी बोलणं याच्यात काहीही चुकीची गोष्ट नाही," असं म्हणत आपण अजित पवारांशी सरकारच्या प्रतिनिधी म्हणून चर्चा केली असल्यास शरद पवारांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.