Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Municipal Election: ...अखेर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं भाजप अन् शिवसेनेला धक्का देत सोलापूरमध्ये मोठा निर्णय घेतलाच!

Ajit Pawar NCP Election : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रचारशिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीनंतर लगेचच राज्यात लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

Solapur News: राज्यातील सुमारे पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान,आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता सोलापूर महापालिकेसाठी तडकाफडकी मोठी घोषणा केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जानेवारी 2026 अखेरपर्यंत या निवडणुका घेणे राज्य निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या दोन्हीही यंत्रणांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आता महापालिका निवडणुकांचाही लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आगामी सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात आणि 102 जागा आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

स्थानिकच्या निवडणुकांना सामोरे जातानाच महायुती असो वा महाविकास आघाडीतून इनकमिंग आणि आऊटगोईंग सुसाट सुरू आहे. याच वाढत्या इनकमिंगच्या जोरावर विधानसभेचे उपसभापती व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अण्णा बनसोडे सोलापूर महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे आता भाजप अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धडधड वाढण्याची शक्यता आहे.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, आम्ही सोलापूरसाठी ‘अब की बार 75 पार’चा दिलेला नारा यशस्वी करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणार आहोत. सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत ती संख्या 75 वर गेलेली दिसेल. आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं बनसोडे यांनी जाहीर केलं.

भाजप सत्तेत असतानाही सोलापूर शहराचा मागील पाच वर्षात अपेक्षित असा विकास आहोत. सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत. त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत कोणाचे आव्हान असेल असं मला वाटत नाही. आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या धर्तीवर सोलापूर शहराचा विकास करू, अशी ग्वाहीही बनसोडे यांनी यावेळी दिली.

एमआयएमचे एकूण 9 नगरसेवक होते. त्यापैकी 6 नगरसेवकांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असून राहिलेल्या 3 जणांसोबत बोलणं सुरू आहे लवकरच ते तीनही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, असा दावाही अण्णा बनसोडे यांनी केला आहे.

सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. सुरुवातीला प्रभाग 25 व 26 हे प्रभाग तीन सदस्यीय असल्यानं त्यामध्ये दोन महिलांचे आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली. त्यात प्रभाग 25 हा सरळ दोन महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 15 जागांपैकी 8 चिठ्ठ्या या महिलांच्या काढण्यात आल्या. त्यामध्ये 25, 13, 15, 4, 6, 21, 26, 17 हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नूतन गायकवाड, वंदना गायकवाड या सेफ झाल्या आहेत तर शिवसेना नेते मनोज शेजवाल, शिवा बाटलीवाला, सुभाष शेजवाळ, यांची अडचण झाल्याचे दिसून येते.

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रचारशिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीनंतर लगेचच राज्यात लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT