Santosh Bangar Raid: संतोष बांगरांच्या घरी 100 पोलिसांची पहाटे धाड; शिवसेनेच्या नेत्यानं थेट विधानसभा अध्यक्षांनाच फिरवला फोन

Hingoli NagarPalika Election 2025: मराठवाड्यातील हिंगोली नगरपालिकेची निवडणूक चांगलीच वादात सापडली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी अगदीच घसरल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरून हिंगोलीचं राजकारण ढवळून निघालं आहे.
Santosh Bangar hemant Patil Rahul Narwekar .jpg
Santosh Bangar hemant Patil Rahul Narwekar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News: मराठवाड्यातील हिंगोली नगरपालिकेची निवडणूक चांगलीच वादात सापडली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी अगदीच घसरल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरून हिंगोलीचं राजकारण ढवळून निघालं आहे.

इतकंच नव्हे तर शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे रडत सांगणारे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून पन्नास कोटी मिळाल्याबरोबर त्यांच्यासोबत गेले, असा आरोपही मुटकुळे यांनी केला.यानंतर शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या घराची तब्बल 100 पोलिसांनी झाडाझडती केल्याची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख असलेल्या हेमंत पाटलांनी एका वृत्तवाहिनीला संवाद साधताना बांगर यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

हेमंत पाटील म्हणाले, कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरी सकाळी पाच ते साडे पाच वाजता 100 पोलिसांनी जात झाडाझडती घेतली. त्यांची 75 ते 80 वर्षांची आई आजारी असते. ती घरात असताना, पत्नी, लहान मुलं घरात असताना, अशा पद्धतीने घरातील सामान काढून बघणं, कपाटातील सामान काढून बघणं, हे अतिशय वाईट पद्धतीनं झालं आहे", अशी नाराजीही पाटील यांनी बोलून दाखवली.

Santosh Bangar hemant Patil Rahul Narwekar .jpg
Congress News: '...म्हणून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला!'; माजी खासदाराच्या दाव्यानं देशाच्या राजकारणात खळबळ

"खरंतर आमदार पद हे संविधानिक पद आहे. त्याला संविधानिक दर्जा आहे. अशा संविधानिक पदाच्या कार्यकर्ता असलेल्या आमदारावर धाड टाकायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. त्या पद्धतीची कोणतीही परवानगी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली नसल्याचा आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे.

पोलिसांच्या या धाडीनंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात आपण संपर्क साधल्याचंही आमदार हेमंत पाटील यांनी सांगितलं. पण अध्यक्षांनी त्यांच्याकडे याबाबत कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नसून धाड टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसल्याचंही ते म्हणाले. पण परवानगी न घेता अशाप्रकारची धाड कुणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आली?", असा हेमंत पाटील सवाल उपस्थित केला.

Santosh Bangar hemant Patil Rahul Narwekar .jpg
Sharad Pawar News: शरद पवार मोठा डाव टाकणार, राज्यात 2 डिसेंबरनंतर राजकीय उलथापालथ? एकाचवेळी महायुती अन् आघाडीही हादरणार

यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी हिंगोली आणि कळमनुरी या दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेची ताकद असून तिथे शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. तसेच दोन्ही ठिकाणी शिवसेनेचेच नगराध्यक्ष होणार असल्याचा दावा केला आहे. कार्यकर्ते अत्यंत उत्तम पद्धतीनं काम करत आह. त्यामुळेच समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याची टीकाही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com