Sangli helicopter travel incident : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला काल एक महिना पूर्ण झाला. विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या विमान अपघातानंतर हवाई प्रवास करताना, पोटात कसा भीतीचा गोळा येतो, याचा किस्सा स्व-अनुभव घेतलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितला.
तसं राजकीय पटलावर पाहिल्यास, पवारांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका राहिली आहे. मात्र गोपीचंद पडळकरांनी अनुभवलेला हवाई प्रवास, अन् त्यांनी त्याचा सांगितलेला किस्सा, नेत्यांचे राज्यातील घाईघाईचे होत असलेले दौरे सोपे नसतात, हेच अधोरेखित होते.
भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर हे धडाकेबाज नेतृत्व, पण अजितदादांच्या विमान अपघातानंतर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर अनुभवलेला हवाई प्रवासाने, भीतीचा गोळा कसा पोटात उठला, याचा किस्सा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला. एकप्रकारे अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका, राजकीय नेत्यांनी किती घेतला आहे, याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल.
मिरज तालुक्यातील बेळंकी इथं आयोजित कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे हेलिकॉप्टरने भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna E. Vikhepatil) यांच्यासोबत पोहोचले होते. या हवाई प्रवासात मंत्री विखे पाटील आणि आमदार पडळकर यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. यात अजितदादांचे विमान अपघातात झालेल्या निधनाचा विषय निघाला.
या गप्पांमध्ये मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास बंद केल्याचं सांगितले. यातच आम्ही देखील हवाई प्रवास करत होतो. मंत्री विखे पाटलांनी पुत्र सुजय याचा हवाई प्रवास थांबवल्याचे सांगितल्यावर आपल्या पोटात गोळा आला, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
पण जतला पाणी मिळणार आहे, म्हणून आपण हेलिकॉप्टरने आल्याचेही पुढे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. अजितदादांच्या विमान अपघातानंतर राजकीय नेत्यांच्या मनात हवाई प्रवासाची कशी भीती आहे, हे आमदार पडळकर यांनी सांगितलेल्या किस्स्यावरून लक्षात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.