Ajit Pawar | Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : पुण्यात भगवा फडकवण्याच्या शिंदेंच्या विधानावर, दादा भडकले म्हणाले, 'लावा लाव्या करायचे बंद करा'

Ajit Pawar On Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भगवा फडकवणार अशी घोषणा केली होती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. नुकताच पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यावर भगवा फडकवायचं विधान केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, राज्यात बालकांचा आरोग्य तपासण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतला आहे. बालकाचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाबाबतही माहिती दिली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

यावेळी अजित पवार म्हणाले, उद्याच्या तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. राज्य सरकार म्हणून आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहोत. केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. तसाच निर्णय आम्ही राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना घेणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पुणे भगवामय करायचं असल्याचं विधान केलं होतं त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही लावा लाव्या करायचे प्रयत्न आता बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला सुरुवात करा. तुम्ही काही केलं तरी आम्ही एकत्र राहण्याचा ठरवला आहे. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तरी हा राष्ट्रवादीचा जिल्हा करू असं म्हणेल. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

ते शिवसेनेचे नेते आहेत. पुणे जिल्हा भगवा करायचा आहे. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले तर ते सांगू शकतात मी गेलो तर मी सांगू शकतो. तुम्ही किती उलट सुलट प्रश्न विचारा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहराज्यमंत्र्यांनी बलात्कारासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, मी कुठलं एक प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही. मात्र काही काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याकरता पोलीस प्रयत्न करतात. मात्र माध्यम सर्वात आधी घाई करतात. काही लोक उतावळेपणाने करतात. घटना घडल्या नाही पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. तपास तातडीने लागला पाहिजे. राज्यकर्त्यासहित सर्वांनी भान ठेवलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT