Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस, राम शिंदे, बबनराव पाचपुते यांचा अजित पवारांनी घेतला समाचार, म्हणाले...

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) नेत्यांवर भाजपकडून ( BJP ) टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या कुटूंबीयांवरही गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले.

Amit Awari

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर भाजपकडून टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटूंबीयांवरही गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या कामांवरही टीका करण्यात आली. अजित पवार यांनी आज भाजप नेत्यांचा समाचार घेत जोरदार टीका केली. Ajit Pawar took the news of Devendra Fadnavis, Ram Shinde, Babanrao Pachpute, said ...

जामखेड येथे विविध विकासा कामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड-श्रीगोंदे असा एक विधानसभा मतदार संघ होता. नंतर श्रीगोंदे मतदार संघ वेगळा झाला. आतापर्यंत या मतदारसंघातील आमदारांनी काय केले यावर मी बोलणार नाही. हा दुष्काळी भाग आहे. येथे पाणी आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला. तुम्ही लोकांनी आमच्या रोहितला मतांचे दान देऊन निवडून आणले आहे. त्याच्यावर विश्वास दाखविला आहे. कोरोनाचा काळ असूनही मागील दोन वर्षांत रोहित पवार यांनी मोठा निधी आणला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना बनविण्याचा प्रयत्न केला. जामखेडमधील पाणी पुरवठा योजना आम्हीच आणली अशी वल्गना केली. पण प्रत्यक्षात आम्ही पाठपुरावा करून ही पाणी पुरवठा योजना केली. विधानसभा निवडणुकांच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कागद दाखवून पाणी पुरवठा योजनेला तत्वतः मंजुरी दिल्याचे सांगितले. लोकांची दिशाभूल केली. महाविकास आघाडी अशी दिशाभूल करत नाही. मीही अनेक वर्षांपासून मंत्री आहे. तत्त्वतः मंजुरी म्हणजे काय? एक तर मंजूर केले म्हणा किंवा मंजूर करू म्हणा, अशी एकाच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली.

ते पुढे म्हणाले, रस्त्यांमुळे दळणवळण वाढते, त्यातून परिसरातील विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळते. मागील आमदारांच्या काळात दर्जेदार कामे झाली नाहीत. त्यामुळे रोहित पवारांना जनतेने आमदार केले. ते आता विकासाचा अनुशेष भरून काढत आहेत. मंजूर केलेली कामे ही त्या-त्या वेळीच पूर्ण करतात. तुम्ही 10 वर्षे आमदार होता. आता गपगुमान बसा. तुम्हाला लोकांनी का घरी बसविले याचे चिंतन करा. उगाच बदनामी बंद झाली पाहिजे, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

बारामती, नांदेड अशा ठिकाणांचा विकास का होतो? लोकप्रतिनिधींनी मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणायचा असतो. आमदार रोहित पवार तसे करत आहेत. एकाच विचाराच्या व्यक्तींकडे सर्वसंस्था द्याव्या लागतात. ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंत सर्व संस्था एकाच विचाराकडे दिल्यास परिसराचा विकास होतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.

पाचपुतेंना टोला

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने दिला नाही एवढा 2800 रुपये प्रतीटन एफआरपी भाव अंबालिका साखर कारखाना देत आहे. करायचे असेल तर समाजाच्या भल्यासाठी काम करा. काही साखर कारखान्यांनी तर मागील दोन हंगामांचे एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, असा टोलाही अजित पवारांनी नाव न घेतात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT