IPS Anjana Krishna visiting Kurdu village during the murum excavation row, where illegal soil mining without government permission sparked political controversy. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Crime : अजितदादा अन् IPS अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ व्हायरल होताच कुर्डू गावचे सरपंच, ग्रामसेवक अडचणीत : गंभीर आरोप करत महिला तलाठ्याची पोलिसांत धाव

Ajit Pawar and IPS Anjana Krishna Viral Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनलं आहे.

Jagdish Patil

Solapur News, 09 Sep : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनलं आहे.

याच प्रकरणावरून राज्यातील राजकारण देखील असतानाच आता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. ती म्हणजे तहसीलदारांची परवानगी न घेता जवळपास अर्धा एकर क्षेत्रातील 120 ब्रास मुरुम बेकायदेशीर पद्धतीने उपसा करून त्याची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी आता कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडिराम पवार या दोघांविरोधात मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच आणि ग्रामसेवकाने मिळून मुरुम उपसा केल्याची तक्रार गावच्या तलाठी प्रिती शिंदेंनी पोलिसांत दिली.

या तक्रारीनंतर केलेल्या तपासात कुर्डू येथे तहसीलदारांची किंवा इतर कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीर मुरुम उपसल्याचं उघडकीस आलं आहे. तर बेकायदेशीर मुरूम उपसा केला जात असल्यामुळेच ती कारवाई रोखण्यासाठी आयपीएस अंजना कृष्णा त्या ठिकाणी गेल्या होत्या.

मात्र, यावेळी संबंधितांवर कारवाई करू नये यासाठी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, गावातील रस्ता करण्यासाठी हा मुरुम लागत होता. मात्र ज्या दोन रस्त्यासाठी मुरूम उपसल्याचा दावा केला जात होता. त्या रस्त्यासाठी दिलेली वर्कऑर्डरची मुदत ही आधीच संपल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

त्यामुळे आता कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी घेतली नसल्याचं स्पष्ट झांलं आहे. दरम्यान, कुर्डू गावातील मुरूम उपसा दरम्यान झालेल्या वादा दरम्यान अण्णा ढाणे, बाबा जगताप यांत्यासह गावातील 15 ते 20 जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे तसंच हाणामारी व बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT