Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : ‘मी पुन्हा येईन’ चा शब्द अजितदादा पाळणार का?

Papri School Bhoomi poojan : शाळेला जागा आणि वर्गखोल्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांनी 16 जुलै रोजी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार केला.

राजकुमार शहा

Mohol, 22 August : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (शुक्रवार, ता. 23 ऑगस्ट) जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यात येत आहेत. ‘मोहोळच्या दौऱ्यावर आल्यानंतर पापरी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या बांधकामाच्या भूमिपूजनाला मी नक्की येईन’ असा शब्द अजित पवार यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र शेळके व मुख्याध्यापक आबा टेकळे यांना दिला होता, त्यामुळे दिलेला शब्द उपमुख्यमंत्री पवार पाळणार का? आणि शाळेच्या भूमिपूजनाला येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोहोळ (Mohol) तालुक्यातील पापरी जिल्हा परिषदेची शाळा (Papri Jillha Parishad School) ही वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांसाठी ओळखली जाते. तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. पापरीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त 757 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ‘हाउसफुल्ल’ असा फलक लावावा लागतो. हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव उदाहरण आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कानावर शाळेबाबतच्या वैशिष्ट्यांची गोष्ट घातली होती. वाढती विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने अजित पवार यांच्याकडे जागेची मागणी केली होती.

शाळेतील विविध प्रयोग, उपक्रमशीलता पाहून तातडीने शाळेला सुमारे अडीच एकर जागा देण्याचा शब्द दिला होता. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती अडीच एकराची जागा शाळेला मिळाली आहे. म्हणजेच अजितदादांनी दिलेल्या दोन शब्दपैकी एक शब्द पूर्ण केला.

एवढ्यावर न थांबता अजितदादांनी वर्गखोल्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधीचीही तरतूद केली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर वर्गखोल्या कामाचे टेंडरही निघाले आहे. त्या कामाचा कार्यारंभ आदेश ही प्राप्त झाला आहे. म्हणजेच काम सुरू करण्यासाठीची सर्व तयारी झाली आहे.

दरम्यान, शाळेला जागा आणि वर्गखोल्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांनी 16 जुलै रोजी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार केला. या पदाधिकाऱ्यांनी त्या वेळी अजित पवार यांना भूमिपूजनाला येण्याची विनंती केली. तसे पत्रही त्यांनी दिले, त्यामुळे भूमिपूजनाला येण्यासाठी दिलेला शब्द उपमुख्यमंत्री पवार पाळणार काय, अशी चर्चा सुरू आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT