Mahayuti News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार

Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वाची बैठक आज (शनिवारी) दिल्लीत होणार आहे. निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavis
Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वाची बैठक आज (शनिवारी) दिल्लीत होणार आहे. अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार असून जागा वाटपाचे फॉर्म्युला निश्चित होणार, असल्याची चर्चा आहे.

लोकसभेतील पराभवानंतर महायुतीने त्यांची एकजूट कायम ठेवली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे जागा वाटपाचा फाॅर्म्युला निश्चित करून निवडणुकीच्या कामाला लागण्याची तयारी महायुतीने केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होते. या भेटीत विविध विषयांसोबत जागा वाटपाच्या संदर्भात देखील त्यांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. या भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत जात आहेत.

Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavis
Video Sharad Pawar : 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हणणाऱ्या शहांचा पवारसाहेबांनी हिशेब चुकता केला; म्हणाले, तडीपार...

लोकसभेला उमेदवार उशीरा घोषित झाले. त्यामुळे महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता. महायुतीला लोकसभेत जे अपयश आले त्यामध्ये जागा वाटपाला आणि उमेदवार जाहीर करण्यास झालेला उशीर हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटप करण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत.

शिंदे गटाला 100 जागा?

शिंदे गटाकडून 100 तर अजित पवार गटाकडून 80 जागांची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर, स्थानिक भाजप नेत्यांकडून भाजपने 150 पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavis
Sharad Pawar : विधानसभेपूर्वी अजितदादांना धक्का? बड्या नेत्यानं घेतली पवारसाहेबांची भेट; घरवापसीचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com