Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Controversial Statement : 'त्या' विधानावरुन अजितदादांचे ट्विट ; तर 'नाटकीबाज' लोकांना दिला इशारा...

Statement against Sharad Pawar : काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते. वक्तव्याचा केला खुलासा

Amol Sutar

NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक विधान केले होते. त्यावरुन राष्ट्रवादीतील राजकारण तापले. त्यावरुन आज खुलासा करत माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यांनी 'एक्स'वर ट्विट केले आहे. तर 'ध' चा 'मा' करणाऱ्या नाटकीबाज लोकांना महत्व देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar's controversial statement against Sharad Pawar)

बारामती येथील अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघात केलेल्या विकासकामांची तुम्हाला जर मला पावती द्यायची असेल, तर अजित पवार हेच लोकसभेचे उमेदवार आहेत, असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि लोकसभा निवडणुकीत निवडून द्यावे, असे आवाहन केले होते.

तसेच 'कुणी भावनिक होत तुम्हाला आवाहन करतील. ही शेवटची निवडणूक असल्याचं सांगतील. खरंच, शेवटची निवडणूक कधी होणार, माहिती नाही. पण, सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, ही विनंती आहे,' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीतील राजकारण तापले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आज अजित पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल खुलासा करत 'एक्स'वर ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे.

मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे." असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. "आपल्या काकांच्या मृत्यूची वाट पाहणं, हे काय राजकारण आहे का? तुमच्याबरोबर काम केल्याची लाज वाटते," असे ते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT