New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच इंडिया आघाडीवरही टीका केली.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच इंडिया आघाडीचाही समावेश घेतला. काँग्रेस सरकारचा कार्यकाळ आणि मोदी सरकारचा दहा वर्षांच्या कामाची तुलना करत मोदींनी जनताच त्यांना धडा शिकवले, असे सांगितले. तसेच पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'अब की बार 400 पार' हा नारा दिला आहे. भाजपसह एनडीएमध्ये सहभागी घटकपक्षांना 400 हून अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्य एनडीएने ठेवले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाष्य केले. मोदींकडून अब की बार... अशी घोषणा देताच एनडीए सदस्यांनी 400 पार म्हणत प्रतिसाद दिला. असे मोदींनी दोन-तीन वेळा बोलत पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावर बोलताना मोदी म्हणाले, आमचेच सरकार तिसऱ्या टर्ममध्येही येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला 370 जागा मिळतील. तर एनडीएला (NDA) 400 हून अधिक जागा मिळणार आहेत. मल्लिकार्जून खर्गेही असेच बोलत आहेत. विरोधकांनी यापुढेही विरोधातच बसण्याचा संकल्प केला आहे. विरोधकांचे हे हाल काँग्रेसमुळे (Congress) झाले आहेत. विरोधकांनी केलेल्या आघाडीत बिघाडी झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरूच राहील
ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांना देशाला परत करावेच लागेल. माझी भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई सुरूच राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. ईडीच्या कारवाईवरून सरकारवर होत असलेल्या टीकेलाही मोदींनी यावेळी दिले. तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे विरोधकांचा संताप होत आहे. देशाची संपत्ती कुणालाही लुटू देणार नाही, असे मोदींनी यावेळी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.