राष्ट्रवादीचे नेते के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यातील जुना वाद संपण्याची चिन्हे आहेत.
अजित पवार 25 ऑगस्टला कोल्हापूर दौर्यावर येणार असून या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने सलोखा प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे.
Kolhapur News : राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील मेव्हण्या पाहुण्यांचा वाद राज्याला सर्वश्रुत आहे. या दोघांच्या वादाचा फायदा यावेळी शिवसेनेला झाला. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार के पी पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील हे सख्खे मेहुणे पाहुणे आहेत. मात्र अंतर्गत वाढलेला संघर्ष आता मिटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने या मेव्हण्या पाहुण्यांच्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar’s Kolhapur Visit on August 25 May End KP Patil – AY Patil Dispute with Hasan Mushrif’s Mediation)
विधानसभा निवडणुकीतील करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांचा येत्या 25 ऑगस्ट रोजी करवीर तालुक्यातील सडोली खालचा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होत आहे. यानिमित्ताने पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नेत्यांची एकमत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे.
माजी आमदार के पी पाटील हे यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांना विश्वासात घेऊनच राजकीय वाटचाल करत असत. दहा वर्ष आमदार म्हणून राहिलेले केपी पाटील यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि सध्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पराभवाचा धक्का दिला. यावेळी माजी आमदार के पी पाटील यांना 2019 च्या निवडणुकीत ए वाय पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत हा शब्द डावलण्यात आला. बिद्री सहकारी कारखान्याचा चेअरमन पदाचा शब्द दिला. त्यानंतरही के पी पाटील यांच्याकडून शब्द पाळा नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर ए वाय पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत के पी पाटील यांच्या विरोधात बंड केले.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पीएन पाटील यांचा गट पालकमंत्री आबिटकर यांच्या मागे राहिला. शिवाय या दोघांचा वादाचा फायदा आबिटकर यांना झाला. विकास कामाची कोणतीच संधी पालकमंत्री अबिटकरांनी सोडली नसल्याने जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मेव्हण्या पाहुण्यांचा वाद अतिशय टोकाचा बनला. बिद्री सहकारी साखर कारखान्यात देखील ए वाय पाटील यांनी के पी पाटील यांच्या विरोधात बंड केले. त्यांनी थेट आबिटकर यांच्या पॅनलमधूनच निवडणूक लढवली.
मात्र दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा होत असल्याचे राजकीय शहाणपण आता पक्षातील नेत्यांसह माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील यांना देखील आले आहे. पुढील वर्षी होऊ घातलेली गोकुळ आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांचीही मने जुळवण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोघांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न येत्या 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.
दरम्यान याबाबत ए वाय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठ नेत्यांकडून त्या संदर्भातील प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निरोप आलेला नाही. वरिष्ठेने याकडे लक्ष दिल्यास त्यासंदर्भातील विचार केला जाईल, असे मत ए वाय पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केले.
प्र.१: के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यातील वाद किती जुना आहे?
उ: हा वाद अनेक वर्षांचा असून राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षाचा भाग आहे.
प्र.२: या वादात हसन मुश्रीफांची भूमिका काय आहे?
उ: ते मध्यस्थ म्हणून दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
प्र.३: अजित पवारांचा दौरा कधी आहे?
उ: 25 ऑगस्ट रोजी ते कोल्हापूरात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.