
Sharad Pawar’s Statement on 160 Seats Offer : विधानसभा निवडणुकीत 160 जागा जिंकून देण्याची ऑफर दोन व्यक्तींनी भेटून दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा दावा खोडून काढत शरद पवारांच्या विधानामुळे केवळ लोकांचे मनोरंजन होईल, अशी टीका केली आहे.
कोल्हापुरात मीडियाशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, शरद पवार यांना ज्या दोन व्यक्ती भेटून जातात. त्यांचं नाव, गाव, पत्ता त्यांना माहीत असेल. ते ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याचवेळी त्यांच्याकडून शरद पवार साहेबांनी प्रयोग करून घ्यायला हवा होता. पण असं काही झालेलं नाही. शरद पवार साहेब गुगली टाकत आहेत. कपोकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजन होईल, असे खोचक विधान मंत्री मुश्रीफ यांनी केलं.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आजच्या मुंबईतील आंदोलनावरून बोलताना मुश्रीफ म्हणाले, कुठलेही आरोप असतील तर ते सिद्ध व्हावे लागतात. आरोप सिद्ध न होता कोणतेही कारवाई होणे शक्य नाही. वातावरण ढवळणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या गोष्टींवर टीका करणे हे देखील विरोधकांचे काम असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं.
अनेक दिवसांपासून मत चोरी झालेली आहे, ती निवडणूक आयोगाने केली आहे, अशी तक्रार राहुल गांधी करत आहेत. गांधी यांनी शपथपत्र देऊन तक्रार करावी, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र पराभव हा पराभव असतो. तो पचवण्यासाठी ताकद लागते. निवडणुकांवेळी कच्च्या मतदार याद्या येतात. त्यावेळी लोक हरकती घेत असतात, कोल्हापुरातून एकही तक्रार आली नाही, याचे उदाहरण आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर महापालिकेवर महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आहे. राष्ट्रवादीची कासवाची चाल आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार, पण जिथे ती होणार नाही तिथं वेगवेगळे लढणार आहोत, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले. कोल्हापूर शहराची हद्दवाढ, पोलीस आयुक्त कार्यालय देखील लवकरात लवकर सुरू होईल. कोल्हापूर शहराची आता महाद्वारे उघडली आहेत असेही मुश्रीफांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्ग करायचाच आहे, पण तो कोणावर लादायचं नाही.शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होणार नाही.बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्चर झालेत हे मला माहिती नव्हतं. त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झाले हे देखील मला माहिती नाही. त्याच्या बांधकामावरून रस्त्याची किंमत ठरत असते. शक्तीपीठ महामार्ग किंमत वाढल्याचं त्यांचा गोड गैरसमज असावा, असंही प्रत्युत्तर मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
के. पी. पाटील यांची भूमिका महायुती विरोधाची नाही. ज्या ठिकाणी युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल. पण एकमेकांवर टीका होणार नाही, याची काळजी महायुतीमधील तिन्ही पक्ष घेतील. माजी आमदार के. पी. पाटील यांनी केलेल्या बंडखोरीच्या वक्तव्यावर मंत्री मुश्रीफ यांनी माजी आमदार के पी पाटील यांची पाठराखण केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.