Ajit Pawar, Jayant Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : जयंतरावांच्या सांगली महापालिकेत सकाळी अजितदादांचा फोटो लावला अन्‌ सायंकाळी काढला!

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आज नगरसेवक अतहर नायकवडी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना भेट दिला.

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आज नगरसेवक अतहर नायकवडी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना भेट दिला. तो त्यांनी महापौर दालनात लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा फोटो लागल्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. मात्र, सायंकाळी अजित पवार यांचा फोटो काढल्याचे समजले.

राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्येही कोण कोठे राहणार याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. मिरजेतील माजी महापौर इंद्रीस नायकवडी आणि नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अजित पवार गटात जायचा निर्णय जाहीर केला. मुंबईतील दोन्ही गटांच्या मेळाव्यानंतर शरद पवार गटाच्या मेळाव्यास हजर राहिलेले महापौर सूर्यवंशी यांनी सायंकाळी अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.

या वेळी नायकवडी आधीपासूनच हजर होते. पवार आणि नायकवडीसोबतचे महापौरांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौरांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे चर्चेवर पडदा पडला होता.

त्यानंतर आज (ता. 10 जुलै) नायकवडी यांनी महापौरांची दालनातच भेट घेऊन प्रतिमा दिली. ही प्रतिमा त्यांनी अजितदादांची असून ती दालनात लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौरांनी ती स्वीकारली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी ती तत्काळ अन्य काँग्रेस (Congress) नेत्यांच्या फोटोंच्या रांगेत लावला. मात्र, सायंकाळी ही प्रतिमा हटवल्याची चर्चा होती.

नायकवडी म्हणाले, ''नेत्यांचे फोटो दालनात लावताना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा हेतू असतो. अजितदादा महापौरांच्या आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेचे कार्यक्षम नेते आहे. त्यांच्या कार्यगुणांचा आदर्श घेऊन महापौरांनीही वाटचाल करावी या हेतूने आम्ही त्यांचा फोटो दिला होता.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT