Lokmanya Tilak Award News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार येणार एकाच मंचावर?

Sharad Pawar News : पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Narendra Modi, Sharad Pawar News
Narendra Modi, Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच येणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार मोदी यांना १ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार आहेत. या कार्यक्रमचे आमंत्रण शरद पवार यांनाही देण्यात आले आहे.

Narendra Modi, Sharad Pawar News
Solapur Politic's : अजित पवारांना धक्का; शहराध्यक्ष अवघ्या आठ दिवसांत शरद पवार गटात सामील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार हे देखील पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत मंचावर दिसू शकतात. असे असले तरी शरद पवार यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण अद्याप स्वीकारले आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींचा घोटाळाचा आरोप केला होता. काही दिवसानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेना (Shivsena) सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसचे त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रपदाची शपथ घेतली.

Narendra Modi, Sharad Pawar News
MLA Disqualification News : ठाकरे गटातील आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा कशाच्या आधारे पाठवल्या... सरोदेंचा सवाल

यावरूनच शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला होता. ते म्हणाले होते ''राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पंतप्रधानांनी या नेत्यांची पूर्ण ताकदीने चौकशी करावी. आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com