Almatti Dam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam : एकनाथ शिंदे यांनी नेमलेली अलमट्टीबाबतची 'रूरकी समिती'च मॅनेज? कर्नाटकला ‘क्लीन चिट’ देण्याच्या तयारीत

Roorkee Committee On Almatti Dam : कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापुरात महापुराचा विळखा बसतो. हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होते. तसा महाराष्ट्राने दावा केला आहे. पण हे सत्य कर्नाटक मान्य करायला तयार नाही. उलट अलमट्टीची उंची वाढण्याचा घाट सरकार घालतय.

Aslam Shanedivan

Kolhapur News : कर्नाटकात असणाऱ्या अलमट्टी धरणामुळे वर्षानुवर्षे सांगली-कोल्हापुरला महापुराचा फटका बसत आहे. याबाबत अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले असून पुरामुळे होणारे नुकसानाचे सत्य कर्नाटक मान्य करायला तयार नाही. उलट अलमट्टीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकार घालत आहे. यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात विरोधाची लाट उसळली आहे. पण आता नवाच मुद्दा समोर आला असून महापूरबाबत अभ्यास करणाऱ्या रूरकी समिती अहवालावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या समितीने अलमट्टी धरण आणि सांगली-कोल्हापुरातील महापूर यांचा परस्पर संबंध अभ्यासून अहवाल तयार केला. ज्यात पहिल्यांदा आधी अलमट्टीला महापुराचे कारण मानले गेले होते. पण आता ही समिती महापुराबाबत अलमट्टीला ‘क्लीन चिट’ देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. यावरून एक समिती एक अहवालाचा नेमका ‘गौडबंगाल’ काय असा आता सवाल उपस्थित केला जातोय.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुराच्या कारणांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूरकी समिती गठीत केली होती. ही समिती उतराखंड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीची आहे. तर या समितीत डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे आणि अभियंता जे. के. पात्रा यांचा समावेश होता. ज्यांनी 1 जून ते 5 जून 2023 दरम्यान सांगलीपासून अलमट्टीपर्यंतच्या कृष्णा नदीपात्राची पाहणी केली होती.

तसेच काही प्राथमिक निष्कर्ष काढले होते. ज्यात कर्नाटकात प्रवाहित होणाऱ्या कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण होणारे स्पॉट सांगितले होते. तसेच 2019 आलेल्या महापुराच्या कारणाला हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद असणे असल्याचेही त्यात नमुद होते. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी आणि हिप्परगी धरणाचे बॅकवॉटरच कारणीभूत ठरत असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच होती.

पण आता अभ्यास समिती आपल्या मुद्द्यावरून घूमजाव करताना दिसत असून अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर झाल्यास काय होईल त्याचा अभ्यास केल्यावरच याबाबत सांगता येईल असे म्हटलं आहे. त्यामुळे आता समितीच्या अहवालावरच प्रश्नचिन्हच उपस्थित होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT