Almatti dam height : ‘आलमट्टी’वरून राजकीय वातावरण तापलं ; जलसंपदा मंत्री विखे पुन्हा घेणार सर्वपक्षीय बैठक!

Background on Almatti Dam Height Controversy : 15 दिवसांत आंदोलकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर अभ्यास करून येण्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनाही आबिटकरांचे आदेश
Almatti Dam
Almatti Dam
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Patil to hold all-party meeting on Almatti dam height issue : कोल्हापूर, सांगलीत येणाऱ्या महापुरास आलमट्टी धरण जबाबदारी नाही, ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह आलमट्टी कसे जबाबदार आहे हे ठासून सांगितल्याने मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मुद्य्यांवर पूर्ण अभ्यास करून 15 दिवसांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन बैठक निर्णय घेऊ असा निर्णय घेतला.

 तत्पूर्वी आंदोलकांनी निवेदन देऊन उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आंदोलक आणि पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी यांची कोल्हापूर मध्ये बैठक करावी. अशा सूचना कोल्हापूर पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना आदेश केले.

दुसरीकडे या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावले नसल्याने माजी मंत्री सतेज पाटील हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पण त्यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांशी चर्चा करून सरकारची भूमिका चुकीची असून या महापुरास आलमट्टी जबाबदार असून या धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही. सरकारने उंची वाढीला कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली, जाईल असा इशारा दिला.

Almatti Dam
Nagpur Municipal Corporation Election - नागपूर महापालिका निवडणूक : ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश; आघाडीबाबत काय म्हटलं?

या बैठकीला कोल्हापूर, सांगलीचे पालकमंत्री, सर्व आमदार पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.आंदोलकांच्या वतीने आमदार अरुण लाड,माजी आमदार उल्हास पाटील इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, माजी सभापती बाजार समिती कोल्हापूर भारत पाटील, माजी सभापती करवीर राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कृष्णा महापूर समिती चे सर्जेराव पाटील दिपक पाटील नागेश काळे डॉक्टर अभिषेक दिवाण दिनकर पवार उपस्थित होते.

Almatti Dam
Justice Duppala Venkata Ramana : ''मला त्रास देण्यासाठीच माझी बदली केली गेली'' ; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा जाहीरपणे दावा!

जागतिक बँकेने 3200 कोटी दिलेले आहेत त्यामध्ये कृष्णा नदीतील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवून महापुराचा प्रश्न संपवणार आहोत, असं सरकारच्या सर्व आमदारांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला उंची वाढवण्यास शासनाने कडाडून विरोध करावा, यावर्षी महापूर येऊ नये म्हणून केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे आलमट्टी धरण प्राधिकरणास पालन करण्यास लावावे व आडमुठी भूमिका घेतल्यास ‘डॅम इन्चार्ज’वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com