Uddhav Thackeray-Babasaheb Deshmukh-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : जयंत पाटलांनी शेकापला रायगडमधील तीन जागा मिळविल्या; पण सांगोल्याच्या देशमुखांचे काय?

Maharashtra Assembly Election 2024 : जयंत पाटील यांनी आपल्या स्वजिल्ह्यातील तीन जागा पदरात पाडून घेतल्या. मात्र, गेल्या निवडणुकीत अवघ्या 768 मतांनी हरलेल्या सांगोल्याबाबत मात्र निर्णय झालेला दिसत नाही, त्यामुळे सांगोल्यात काय होणार, याची उत्सुकता आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 04 November : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल या तीन जागा शेतकरी कामगार पक्षाला देणार आहे. या जागांवरून शिवसेनेचे उमेदवार माघार घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन जागा पदरात पाडून घेत असताना सांगोल्यातून निवडणूक लढविण्यावर ठाकरेंची शिवसेना मात्र ठाम असल्याचे दिसून आले, त्यामुळे सांगोल्यात मैत्रीपूर्ण लढत होणार की शेकाप माघार घेणार, याबाबतची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला (PWP) एकही जागा न सोडता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसून येत होती. मात्र, रविवारी दिवसभर झालेल्या घडामोडीत शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाकडून मित्रपक्षाला जागा सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शेकापचे सचिव जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामध्ये बैठकीत शेतकरी कामगार पक्षाला तीन जागा सोडण्याचा निर्णय झाला. या तीनही जागा जयंत पाटील यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील आहेत. त्या बैठकीतील सूत्रानुसार अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात येणार आहेत.

जयंत पाटील यांनी आपल्या स्वजिल्ह्यातील तीन जागा पदरात पाडून घेतल्या. मात्र, गेल्या निवडणुकीत अवघ्या ७६८ मतांनी हरलेल्या सांगोल्याबाबत मात्र निर्णय झालेला दिसत नाही, त्यामुळे सांगोल्यात काय होणार, याची उत्सुकता आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्या दीपक साळुंखे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेली आहे.

सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगोल्यातून ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या वेळी त्यांच्या पाठीशी शेकाप आणि पक्षाचे सचिव जयंत पाटील होते. मात्र, आता जयंत पाटील यांना तीन जागा सुटल्या आहेत. त्यामळे डॉ. देशमुखांची भूमिका काय असणार, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT