Manoj Jarange's Decision : जरांगेंच्या माघारीच्या भूमिकेवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; ‘कुठला दबाव आला अन्‌....’

Sambhaji Raje's Reaction : एका समाजाच्या भरवश्यावर निवडणूक लढवू शकत नाही, त्यांची ही भूमिका योग्य आहे. निवडणूक लढविताना सामाजिक समीकरणे लक्षात घ्यावे लागतात.
Sambhaji Raje-Manoj Jarange patil
Sambhaji Raje-Manoj Jarange patilSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 04 November : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर समाजातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याच्या मुद्यावर ‘मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी विचार करून निर्णय घेतला असावा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाचे समीकरण बांधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार त्यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, ते मतदारसंघही रविवारी रात्री जाहीर केले होते. मात्र, एका रात्रीतच मनोज जरांगे पाटील यांनी निर्णय बदलला आणि आज सकाळी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली.

मित्रपक्षाकडून उमेदवारांची यादी न आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण कोणत्याही एका समाजाच्या बळावर निवडणूक लढवता येत नाही, हे लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यात आली आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा करताना सांगितले.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मनोज जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला आताच माहिती मिळाली आहे. संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कमेंट करणे योग्य नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आजवर मराठा समाजाच्या हितासाठी भूमिका घेतलेली आहे. माघारीचा निर्णयही त्यांनी निश्चितच विचार करूनच केला असेल. आम्ही लवकरच त्यांना भेटू आणि सविस्तर चर्चा करूना त्यांनी असा निर्णय का घेतला हे समजून घेऊ.

Sambhaji Raje-Manoj Jarange patil
Jayshree Patil : जयश्री पाटलांनी धुडकावली कदम, पाटलांसह काँग्रेसच्या बड्या नेत्याची विनंती; अपक्ष लढण्यावर ठाम

मनोज जरांगे पाटील हे आजवर मराठा समाजाला हितकारक निर्णयच घेत आले आहेत. ते घाई गडबडीने कोणताही निर्णय घेत नाही. माझी ओळख त्यांच्यासोबत आजची नाही, तर अनेक वर्षापासून मी त्यांना ओळखतो, त्यामुळे त्यांनी विचार करूनच माघारीचा निर्णय घेतला असावा, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

संभाजीराजे म्हणाले, एका समाजाच्या भरवश्यावर निवडणूक लढवू शकत नाही, त्यांची ही भूमिका योग्य आहे. निवडणूक लढविताना सामाजिक समीकरणे लक्षात घ्यावे लागतात. त्यांच्यावर कुठला दबाव आला आणि ते त्यात अडकले, असे मला अजिबात वाटत नाही. आजवर ते परखड भूमिका मांडत आले आहेत.

मनोज जरांगे यांनी माघार घेतली, हा शब्द चुकीचा आहे. समाजासाठी काय हिताचे आहे, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असावा. लवकर आम्ही त्यांना भेटून याबाबत चर्चा केली जाईल. विधानसभेत आपलं माणूस गेलं पाहिजे. विधानसभेत गेल्याशिवाय समाजाची भूमिका मांडता येत नाही, अशी मनोज जरांगे यांची निवडणूक लढविण्यामागची भूमिका होती, असेही त्यांनी नमूद केले.

Sambhaji Raje-Manoj Jarange patil
Solapur South Constituency : महाआघाडीच्या ‘धर्मा’ला काडादी, माने जागणार? माघार घेणार की अपक्ष लढणार?

ते म्हणाले, एखादा आंदोलन दीड वर्ष टिकून आहे, हे काम सोपं काम नाही. मनोज जरांगे यांच्याकडे जे काही लोक गेले आहेत, ते स्वार्थासाठी गेले होते. परिवर्तनासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी, अशी अपेक्षा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com