Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Historic Decision : सोलापूरसाठी ऐतिहासिक निर्णय; सुशीलकुमार शिंदेंचे नाव घेत बावनकुळेंची घोषणा, 118 वर्षांपासूनचा प्रश्न मिटला...

Solapur B-2 Property Issue : सोलापूरमधील बी-२ प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. ११८ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघाल्याने सुमारे ९ हजार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 09 July : मुख्यमंत्री देेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ११८ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावत सोलापूरसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरातील बी-२ च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार आहेत, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या निर्णयाचा फायदा शहरातील नऊ हजार कुटुंबांना होणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सोलापूर शहरात ११८ वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळात कामगारांच्या वसाहतीसाठी जमिनी देण्यात आल्या होत्या. त्या बी-२ जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू होता. शहरात अशा सुमारे ८१३ मिळकती आहेत, त्यामध्ये सुमारे ९ हजार कुटुंबे आणि सुमारे ४० हजार लोक आजही राहतात.

सोलापूर शहरातील या जमिनी फ्री होल्ड करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती, त्यामुळे सर्व विभागांनी त्यापुढे हात टेकले होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढेही हा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र, तो प्रश्न काही सुटत नव्हता, असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील जमिनी फ्री होल्ड करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. त्यानंतर मी पुढाकार घेऊन तो प्रश्न धसास लावण्याचे काम सुरू केले आहे. आम्ही या प्रश्नावर काम करून तो बुधवारी मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आला आणि मला अभिमान आहे की, मंत्रिमंडळाने एकमताने त्या जमिनी फ्री होल्ड करण्यास मंजुरी दिली.

सोलापूर शहरातील बी-२ मध्ये ८१३ मिळकती, ज्यामध्ये ९ हजार परिवार आहे, त्यांना आता फ्री होल्ड करण्यात आले आहे. त्या जमिनी फ्री होल्ड करताना १९८९ चा जो रेडिरेकनर होता, त्याच्या फक्त अडीच टक्के पैसे भरून घेण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील बी-२ सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार आहेत, असा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कामासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला होता. निवडून आल्यापासून त्यांनी हा प्रश्न सरकार दरबारी लावून धरला आणि त्यावर आज निर्णय झाला. त्यामुळे कामगारांच्या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यात आमदार कोठे यांचे मोठे योगदान आहे, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT