Tukaram Mundhe : दूध भेसळीच्या हॉटस्पॉटवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक : आठवड्याभरातच उद्ध्वस्त केलं आणखी एक रॅकेट

FDA Action In Solapur : दूध भेसळ प्रकरणात एफडीएने अकलूजमधील गोदामातून ९६,७८० किलो संशयित पावडर जप्त केली. जप्त साठ्याची किंमत १.३४ कोटी रुपये असून तपास सुरू आहे.
Akluj FDA Action
Akluj FDA ActionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 July : दूध भेसळीचे अकलूज कनेक्शन पुढे आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये अटक केलेला हेमंत कार्पोरेशनचा मालक हेमंत टेके याच्या अकलूजमधील गोदामातून तब्बल ९६ हजार ७८० किलो पावडर (किंमत एक कोटी ३४ लाख ४६ हजार ८१ रुपये) जप्त करण्यात आली आहे. ही पावडर भेसळीसाठी वापरत असल्याचा एफडीएचा संशय आहे.

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सवर एफडीएने छापा टाकला. त्यात ३ लाख ५ हजार ३६० रुपये किमतीचे गाईचे ७ हजार ६३४ लिटर दूध ओतून देऊन नष्ट करण्यात आले. दर्जाहीन आणि भेसळयुक्त असण्याच्या शक्यतेमुळे हे दूध नष्ट करण्यात आले आहे. या डेअरीने दर्जाहीन दूध स्वीकारल्याचे आणि त्याबाबतचे कागदोपत्री पुरावेही आढळून आले.

दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये परवा मंचर येथे करण्यात आलेल्या कारवाईत अकलूजमधील हेमंत कार्पोरेशनचा मालक हेमंत टेके यालाही अटक करण्यात आली आहे. भेसळीच्या अनुषंगाने एफडीएने अकलूजमध्ये छापेमारी केली.

अकलूजलगतच्या माळेवाडी येथे टेके याचे गोदाम होते. ते गोदाम काही दिवसांपूर्वी त्याने बंद केले होते. त गोदाम सध्या अकलूजमधील नामदेव मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आहे. एफडीएच्या कारवाईत त्या गोदामात १० प्रकारच्या पावडरचा साठा आढळून आला आहे. त्यात बॉडी बिल्डिंग, प्रोटीन वाढविणे, तसेच दुधातील ‘एसएनएफ’ वाढीसाठी ती दूध पावडर वापरली जात होती, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Akluj FDA Action
Maharashtra Politic's : मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत : पवारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंशी अर्धा तास चर्चा...

दरम्यान, हेमंत टेके याच्या गोदामातून जप्त केलेली दूधपावडर भेसळयुक्त होती का, हे त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. हेमंत टेके हा पावडर विक्रीचा मोठा डिलर आहे. या व्यवसायामध्ये तो अनेक वर्षांपासून आहे. पावडर विक्रीचा त्याच्याकडे परवाना असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी स्पष्ट केले.

मुंढेंची कारवाई; सोलापूरचे अधिकारी अनभिज्ञ

माळशिरस तालुक्यातील अकलूजचा हेमंत टेके आणि पिलीवचा सोनू घोरपडे यांची नावे दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये आढळली आहेत. पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. टेकेच्या गोदामातील पावडरचा तपास सुरू आहे.

Akluj FDA Action
Solapur DPC : डीपीसीतील मनमानीला चाप बसणार : विकासकामांची सद्यःस्थिती दोन आठवड्यांत सादर करा, इस्लामपूर ग्रामपंचायतीच्या याचिकेवर कोर्टाचे निर्देश

ठाण्यातील एकजण दूध भेसळीसाठी केमिकल पुरवत होता, तर अकलूजचा टेके पावडर पुरवठादार होता, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांना दिली. सोलापूरमधील अधिकाऱ्यांना त्याबाबत काहीच माहिती नाही. सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी केवळ टेकेचे गोदाम सील करून पावडर जप्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com