खानापूर : खानापूर नगरपंचायतीची निवडणूक (Nagar panchayat Election) भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत पुन्हा सत्ताधारी शिवसेना (Shivsena) - काँग्रेसच्या (Congress) पॅनेलने बाजी मारली. भाजपला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. एवढेच नव्हे तर भाजपच्या सगळ्या उमेदवारांना मिळून फक्त 105 मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. (Gopichand Padalkar News Updates)
खानापूर (Khanapur) ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना महाआघाडी, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांची जनता आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले. त्यांनी 17 पैकी 9 जागा जिंकून काठावरील बहुमत मिळावले आहे.
गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी या निवडणुकीसाठी जोर लावला होता. विजय आपलाच होणार, असा विश्वास त्यांना कार्यकर्त्यांना दाखवला होता. त्यांनी नगरपंचायतीसाठी पॅनेल उभे करून 17 पैकी 16 जागांवर उमेदवार दिले होते. प्रत्यक्षात भाजपच्या एकाही मतदाराला विजय मिळवता आला नाही. भाजपच्या सगळ्या उमेदवारांना एकूण मिळून 105 मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 7, 8, 10, 12, 13, 15 या प्रभागांमधील भाजप उमेदवारांना दोन आकडी मतदानही झालेले नाही. फक्त 6 आणि 11 या प्रभागांमध्ये त्यांना दोन आकडी मतदान झाले आहे.
या निवडणुकीत भाजपनेही जोर लावला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ताकद लावली होती. पडळकर यांनी खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील स्थानिक पातळीवर राजकीय प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपला भोपळाही फोडता आली नाही. पडळकरांना तालुक्यातील नगरपंचायतीत भाजपचे साधे खातेही उघडता आलेले नाही. यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणातील त्यांचा प्रवेश सोपा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीत सत्ताधारी आमदार अनिल बाबर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास नाना शिंदे यांच्या कॉंग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले. सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या असून, त्यांचा एक समर्थक अपक्ष निवडून आला. राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले. या आघाडीच्या राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांच्या गटाने सत्ता परिवर्तनासाठी ताकद लावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.