भाजपचं अखेर ठरलं..पण उत्पल पर्रीकर मोठा धक्का देण्याच्या तयारीत

गोवा विधानसभा निवडणुकीआधी (Goa Election 2022) भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar
Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) तिकिट भाजपने कापले आहे. यामुळे उत्पल हे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवारी यादी जाहीर केली असून, पर्रीकरांनी पणजीतून तिकिट देण्यात आलेले नाही. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar) फडणवीस यांनी आज गोव्यातील भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी आता मोठा निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहे. ते भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरच जाहीरपणे भूमिका मांडण्याचे त्यांनी म्हटले आहे. (Goa Political News)

उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीबद्दल फडणवीस यांनी नुकतेच संकेत दिले होते. फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीबाबत हात झटकल्याचे मानले जात होते. त्यांच्या विधानानंतर पर्रीकर यांचा भाजपकडून पत्ता कट होण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे आता त्यांना तिकिट न देता भाजपकडून दुसरे काय मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. याचवेळी उत्पल पर्रीकर तिकिट न मिळाल्याने ठाम भूमिका घेत पणजीतूनच लढण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे समजते. (Utpal Parrikar News Updates)

Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar
उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार? पणजीतून तिकिटाची खुली ऑफर

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Utpal Parrikar News Updates)

Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar
भाजपकडून उत्पल पर्रीकरांचा पणजीतून पत्ता कट! फडणवीसांनीच केली घोषणा

पणजीच्या जागेवर सध्या भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी व विद्यमान मंत्री जेनिफर यांना टालगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com