सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. कै. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून सातारा तालुक्यातील सर्वच्या सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा झाला. यावेळी सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांच्यासह प्रदीप विधाते, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, रामराव लेंभे आदी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहकार पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. तसेच बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पॅनेलला सहकार्य केले त्यांचेही आभार मानण्यात आले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेल्या ५- ६ वर्षात बँकेचा अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामकाज केले. सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झाले आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.
बँकेचा इतिहास पाहता राजकारण विरहित कामकाज झाले आहे. राज्य आणि देशात आपल्या बँकेचे नाव अग्रेसर आहे आणि बँकेची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी १०० टक्के खंबीरपणे उभे राहतील.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, किरण साबळे पाटील, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, अरविंद जाधव, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, आशुतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, मिलिंद कदम, प्रकाश बडेकर, रामभाऊ जगदाळे, विक्रम पवार, सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, दादासाहेब बडदरे यांच्यासह सातारा तालुक्यातील सर्व मतदार, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.