संघर्ष मला नवीन नाही, कोणालाही घाबरु नका : शिवेंद्रसिंहराजे

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपला स्वार्थ साध्य होत नसल्याचे दिसताच रेटून खोटं बोलायचं आणि चांगल्या संस्थेची बदनामी करायची, लोकांची आणि मतदारांची दिशाभूल करायची हा प्रकार सध्या जोमात सुरु आहे.
shivendraraje Bhosale
shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही. त्यामुळे कोणी काहीही करू द्या, कोणाला घाबरायचं काहीही कारण नाही. मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील जिल्हा बँकेच्या मतदारांना दिला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त शेंद्रे येथील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदारांच्या मेळाव्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, अनिल देसाई, माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, सातारा नगर पालिकेचे नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, लीना गोरे, सोनाली नलावडे, दीपलक्ष्मी नाईक, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, सर्व संचालक, रामभाऊ जगदाळे, लालासाहेब पवार, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, सदस्य जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, गणपत शिंदे, उत्तमराव नावडकर उपस्थित होते.

shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढू...... 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपला स्वार्थ साध्य होत नसल्याचे दिसताच रेटून खोटं बोलायचं आणि चांगल्या संस्थेची बदनामी करायची, लोकांची आणि मतदारांची दिशाभूल करायची हा प्रकार सध्या जोमात सुरु आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही. उलट मतदार आणि जिल्हावासियांचे मनोरंजनच होत आहे. राज्य आणि देशपातळीवर नावाजलेल्या जिल्हा बँकेबाबत अपुऱ्या माहीच्या आधारे कोणी तथ्यहीन आरोप करत असेल तर त्या बँकेचा अध्यक्ष म्हणून त्या आरोपांचे खंडण करणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे माझे कर्तव्यच आहे.

shivendraraje Bhosale
"जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे"- उदयनराजे भोसले; पाहा व्हिडिओ

गेले पाच- सहा वर्ष चेअरमन म्हणून काम करताना बँकेची आर्थिक स्थिती आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न मी केला आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेच्या भागभांडवल, कर्जपुरवठा, ठेवी आदी सर्व बाबींमध्ये तीनपट वाढ झाली आहे. कै.भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यात विविध सहकारी संस्थांची उभारणी केली आणि त्या नोंदणीकृत संस्था आता बँकेच्या मतदार आहेत. भाऊसाहेब महाराजांनंतर मी तुमच्या पाठबळावर संघर्षातूनच पुढे आलो आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी.

shivendraraje Bhosale
मी नियमाने वागणारा माणूस : ‘जरंडेश्वर’बाबत आरोप करणाऱ्यांविषयी मला काही बोलायचे नाही!

मतदारांनी कोणालाही घाबरायचं कारण नाही. काहीही असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. मी व माझ्या सहकारी नेत्यांकडून जे पॅनल निश्चित होईल त्यालाच सर्वांनी साथ द्यावी आणि आपल्याच उमेदवारांना निवडून द्यावे. राजू भोसले यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले. सतीश चव्हाण, चंद्रकांत जाधव यांचे मनोगत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com