Amal Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amal Mahadik : "कोल्हापुरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून..."; अमल महाडिकांची मागणी!

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत, अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.

त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी माजी नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला महानगरपालिकेकडून विनाविलंब मिळावा, अशा आशयाचे पत्र त्यांनी आयुक्तांना सादर केले. आयुक्तांनी सकारात्मकता दाखवत लवकरच ना हरकत दाखला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन दिले.

या हस्तांतरामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर सदर रस्त्यांच्या डागडुजीपोटी पडणारा मोठा आर्थिक भार हलका होणार असून, भाविक आणि नागरिकांचीही सोय होणार आहे. लवकरच कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा आहे.

यामध्ये वाशी नाका ते महापालिका, शिवाजी पूल ते महापालिका, उजळाईवाडी ते ताराराणी पुतळा, शिये फाटा ते कसबा बावडा - ताराराणी पुतळा रस्ता, तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा रस्ता, फुलेवाडी चौक ते महापालिका, सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ आणि उचगाव ते टेंबलाई नाका चौक आदी रस्त्यांचा समावेश आहे.

रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर रस्त्यांची परिस्थिती सुधारेल. शिवाय महापालिकेवरील भार कमी होईल. याशिवाय पर्यटक, भाविकांचीही मोठी सोय होईल असं अमल महाडिक म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT