Karad Politics : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कराड दौऱ्यामुळे पोलिसांची पळापळ; खासदार सुळे जुन्या सर्किट हाऊसला मुक्कामी

Eknath Shinde - Ajit Pawar News : ...तर सत्तेत नसलेल्या सुप्रिया सुळे यांना जुन्या सर्किट हाऊसला राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Eknath Shinde - Ajit Pawar News
Eknath Shinde - Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

- विशाल वामनराव पाटील

Karad News : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी कराड दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामुळे कराड पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

कराड येथे 18 वे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन होत असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून परत माघारी फिरणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी दोन स्वतंत्र ताफा तयार ठेवले आहेत.

Eknath Shinde - Ajit Pawar News
Sessions of Parliament : पाच राज्यांतील निवडणूक निकालाचा संसद अधिवेशनावर जाणवणार परिणाम; विरोधकांची घेरण्याची तयारी

कराड येथे उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत असले तरी त्यांची दौऱ्याची वेळ वेगळी असल्याने पोलिसांच्या बंदोबस्तावर ताण दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सकाळी आठ वाजता अभिवादन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी येणार असून तेथूनच ते माघारी फिरणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत नक्की होत नव्हता, अखेर शनिवारी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाला आहे.

त्यामुळे कराडला येऊन दोघे एकमेकांची भेट घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी- उपमुख्यमंत्री दोघांसाठी स्वतंत्र तयार ठेवले असून पोलिसांनी दौरा मार्गाची पाहणी केली. यावेळी जवळपास 20 ते 25 पोलिस गाड्यांचा ताफा कराड शहरातून नेत अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी मार्गाची पाहणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्तेतील अजित पवारांना नवं तर सुळेंना...

कराड शहरात दोन शासकीय विश्रामगृह आहेत यामध्ये एक जुने सर्किट हाऊस तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेले नवं सर्किट हाऊस आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) नवीन सर्किट हाऊसमधील प्रतापगड हा सूट देण्यात आला आहे. तर सत्तेत नसलेल्या सुप्रिया सुळे यांना जुन्या सर्किट हाऊसला राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोघेही भाऊ बहीण कराड दौऱ्यावर मुक्कामी असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच शनिवारी सकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी एकत्रित जाणार की दोघांच्यामध्ये अबोला दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.(Latest Marathi News)

Eknath Shinde - Ajit Pawar News
Maratha Reservation : तुषार दोशींची तीन दिवसांत दुसऱ्यांदा बदली, केसरकरांच्या विरोधानंतर गृहविभागाचं एक पाऊल मागे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com