Savner Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Savner Assembly Constituency : केदारांच्या मतदार संघावर रणजित देशमुखांच्या धाकट्या पुत्राचा दावा

Maharashtra Assembly Elections 2024 : सावनेर विधानसभा मतदार संघावर काँग्रेस नेते सुनील केदार यांचे कट्टर प्रतिस्पर्धी रणजित देशमुख यांच्या पुत्रांने दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : राज्याचे माजी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे बडे नेते असलेल्या सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदार संघावर त्यांचे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल देशमुख यांनी दावा केला आहे.

त्यामुळे सावनेर मतदार संघात राजकीय खेळ्यांनी आखाडा चांगलाच तापणार आहे.

केदार आणि देशमुखांचे राजकीय वैर सावनेर विधानसभा मतदार संघातूनच सुरू झाले. रणजित देशमुख सावनेरचे आमदार होते. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ते शेजारच्या काटोल विधानसभा मतदार संघातील असताना सावनेरमध्ये आल्याने केदार नाराज होते. यातूनच वैर वाढत गेले. केदारांनी त्यांना सावनेरमध्ये चॅलेंज देऊन विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत केले होते. तेव्हापासून केदारांचा राजकीय उदय झाला. त्यानंतर देशमुख नागपूरमध्ये परतले. पश्चिम नागपूरमधून विधानसभेच्या निवडणुकीत (Election) उतरले होते. मात्र पुन्हा त्यांच्या नशिबी पराभव आला.

आता त्यांची पुढची पिढी राजकारणात आली आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र आशिष देशमुख यांनी भाजपात (BJP) प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. विशेष म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आशिष देशमुख यांनीसुद्धा केदारांच्या विरोधात सावनेरमधूनच निवडणूक लढवली होती. त्यावेळी अतिशय अटीतटीची लढत झाली होती. त्यात थोडक्यात केदार बचावले होते. त्यानंतर आशिष देशमुख यांना भाजपने काटोल विधानसभा मतदार संघात पाठवले. त्यांनी आपले काका व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभवाचा धक्का दिला होता. ते पुन्हा काटोलमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

काँग्रेस उमेदवाराच्या शोधात

सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यांना पुढील पाच वर्ष निवडणूक लढता येणार नाही. येथे काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेत आहेत. रणजित देशमुख यांचे धाकडे चिरंजीव अमोल देशमुख यांनी सावनेर आणि रामटेक या दोन मतदार संघावर दावा केला आहे. रामटेक शिवसेनेला सोडणार असाल, तर सावनेर विधानसभा मतदारसंघ द्या, अशी त्यांनी मागणी केली आहे.

राजकीय गुंता...

नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक नसीम खान यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली. मात्र नागपूर जिल्ह्यातील तिकीट वाटपाचा अधिकार केदारांनी आपल्याकडे ठेवला आहे. ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदार संघाच्या मुलाखतींचा कार्यक्रमसुद्धा त्यांच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आला. देशमुखांसोबत असलेले वैर बघता केदार, अमोल देशमुख यांचा नावाचा विचार करणे अवघड आहे. अमोल देशमुख यांनी यापूर्वी रामटेक विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT