Amol Mitkari News : भाजपचे 'गोडवे' तर स्वपक्षातील 'त्या' नेत्यांना टोले; अमोल मिटकरींचं ट्विट चर्चेत

NCP MLA Amol Mitkari Tweet : विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी (ता.17) ट्विट केले. त्यात त्यांनी भाजपचे गोडवे गातानाच आपल्या पक्षातील विधान परिषद किंवा आगामी निवडणुकीत आमदारकीचे चान्सेस नसल्यामुळे पक्षनिष्ठा गुंडाळून पक्षांतराची उड्डाणे करणार्‍यांना खडबोलही सुनावले आहेत.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Akola News : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी सेफ किंवा संधी असलेल्या राजकीय पक्षात उड्या घ्यायला सुरुवात केली आहे. त्यात काही करुन आमदारकी मिळवायचीच असा 'पण' मनाशी करुन अनेकांनी पक्षनिष्ठाही गुंडाळून ठेवली. तर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेसाठीही अगदी मोजक्याच जागा असताना देव पाण्यात ठेवलेल्या इच्छुकांची संख्या मात्र काहीपट होती. त्यामुळे साहजिकच अनेकांच्या पदरी निराशा पडली.

त्यावरुन आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगले असून धडाधड राजीनामे पडताहेत.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मात्र ट्विटद्वारे या नाराजांना टोला लगावला आहे.

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी (ता.17) ट्विट केले. त्यात त्यांनी भाजपचे गोडवे गातानाच आपल्या पक्षातील विधान परिषद किंवा आगामी निवडणुकीत आमदारकीचे चान्सेस नसल्यामुळे पक्षनिष्ठा गुंडाळून पक्षांतराची उड्डाणे करणार्‍यांना खडबोलही सुनावले आहेत.

पुणे शहरातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेची संधी नाकारल्याने शहर राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. सुमारे 800 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत असून शनिवारपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच मानकरांनीही पक्षश्रेष्ठींवर टीकेची झोड उठवली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता मिटकरींनी ट्विट करत आपल्या पक्षातील 'नाराजीनाट्या'वर बोट ठेवले आहे.

Amol Mitkari
Kangana Ranaut Emergency Movie : कंगना रनौतच्या 'Emergency'ला अखेर 'Censored'कडून मिळाला 'Green Signal'

मिटकरी ट्विटमध्ये काय म्हणाले...?

आमदार मिटकरी ट्विटमध्ये म्हणतात, मी भाजपचा कार्यकर्ता नाही,त्यांच्या विचारधारेशी माझी विचारधाराही जुळत नाही. मात्र, या पक्षात पद भेटलं नाही म्हणून पक्षश्रेष्ठींबद्दल अनुद्गार काढणे, तात्काळ राजीनामे देणे, लागलीच पक्ष बदलणे असे प्रकार दिसत नाहीत. पक्षासाठी समर्पण ही भावना निश्चित शिकण्यासारखी आहे.यानंतर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये #नाराजीनाट्य असा हॅशटॅगही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्य पदावरती पुण्यातून शहराध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी लागावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेऊन मागणी केली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी सात नावांची घोषणा करण्यात आली त्यांना शपथ ही देण्यात आली मात्र त्यामध्ये दीपक मानकर यांचं नाव नसल्याचे समोर आले. यानंतर नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे.

Amol Mitkari
Parivartan Mahashakti News : 'परिवर्तन महाशक्ती' आघाडीचा मोठा निर्णय; तब्बल 'एवढ्या' जागा लढणार

'याचा पक्षाला विसर पडत आहे...'

याबाबत मानकर म्हणाले, पक्षफुटीनंतर नव्या जोमाने पक्ष व संघटना बांधणीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले. १६०० जणांची जम्बो कार्यकारिणी तयार केली. विविध कार्यक्रम घेऊन पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. असे असताना, पक्षाने संधी न दिल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पक्षाने मला ताकद दिली, तर कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे, याचा पक्षाला विसर पडत आहे.' अशा शब्दात दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com