Solapur News, 19 Nov : राज्यभरात सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांच्या आतापर्यंतच्या बिनविरोधच्या परंपरेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांनी आव्हान दिले होते.
मात्र, थिटे यांनी आपणाला अर्ज भरण्यासाठी जाऊ दिलं जात नसल्याचा राजन पाटील यांच्यावर आरोप केला. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात उज्वला थिटे उमेदवारी अर्ज भरला. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला.
थिटे यांचा अर्ज बाद होताच नगरपंचायत कार्यालयासमोर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिलं.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत 'अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही', असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील बाळराजे पाटील यांच्या वक्तव्यावरून थेट राजन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, 'आदरणीय राजन पाटील साहेब, आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे. परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही.
ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या.
असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा.' अशा शब्दात रोहित पवारांनी काका अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्याच्या प्रकरणावरून राजन पाटलांच्या मुलासह भाजपवर निशाणा साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.