Nandurbar Politics : भाजपचा नेता लोकसभा अन् विधानसभेचा वचपा नगरपालिका निवडणुकीत काढणार, शिंदेंच्या आमदाराला दिलं आव्हान!

Nandurbar BJP vs Shinde Sena : आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावित यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. आमदार रघुवंशी यांच्याशी युती करण्याची शक्यता फेटाळून लावली. या संदर्भात पक्षाच्या आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.
Dr. Vijay Kumar Gavit, Chandrakant Raghuvanshi
Dr. Vijay Kumar Gavit addressing supporters during the heated Nandurbar political campaign. The image reflects rising BJP–Shinde Sena rivalry in the region.Sarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News, 19 Nov : आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार नगरपालिकेवर सत्ता आहे. या सत्तेला यंदा महायुतीतील घटक भाजपनेच आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षापेक्षा नेत्यांची परीक्षा ठरणार आहे.

नंदुरबार नगरपालिका निवडणूक भाजपने स्वबळाची घोषणा केली. महायुतीचा घटक शिवसेना शिंदे पक्षाने त्याआधीच स्वबळाची तयारी केली होती. त्यामुळे महायुतीचा घटक असूनही येथे युती ऐवजी संघर्ष पेटणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला शिंदेंच्या शिवसेनेने खिंडीत गाठले होते. हा राग माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित विसरलेले नाही. यावरून शिवसेनेला डिवचण्याची कोणतीही संधी ते सोडत नाही.

Dr. Vijay Kumar Gavit, Chandrakant Raghuvanshi
Municipal council election : प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, तर ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वीच झाले बाद...

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावित यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. आमदार रघुवंशी यांच्याशी युती करण्याची शक्यता फेटाळून लावली. या संदर्भात पक्षाच्या आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार नगरपालिका निवडणूकीत सर्व जागांवर भाजपने उमेदवारी दिली आहेत. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. मतदानातून ते दिसेल. आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवू, असे भाजप नेते डॉ. गावित म्हणाले.

Dr. Vijay Kumar Gavit, Chandrakant Raghuvanshi
Mahayuti Politics : शिंदेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच अजितदादांनी पळवला, आता उमेदवारी अर्ज मागे घेत करणार राष्ट्रवादीचं काम

भाजपने अविनाश माळी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने बडतर्फ झालेल्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांची घरवापसी झाली. सुप्रिया गावित यादेखील यावेळी उपस्थित होत्या. या सर्व घडामोडी भाजपची ताकद वाढविणाऱ्या असल्याचा दावा करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com