devendra Fadanvis, Anil Babar, Eknath shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anil Babar : अनिल बाबरांचे 'हे' स्वप्न पूर्ण करणार; शिंदे, फडणवीसांची ग्वाही

Political News : आमच्या संघर्षाच्या काळात आणि भाऊ ताकदीने उभे राहिले असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Anil Kadam

Sangali News : आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अनिल बाबर यांनी कामाचा ठसा उमटविला आहे. सिंचन योजनांच्या पाण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. टेंभू योजनेचा सहावा टप्पा हे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न होते. ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमच्या संघर्षाच्या काळात आणि भाऊ ताकदीने उभे राहिले असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गार्डी तालुका खानापूर येथे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन श्रद्धांजली वाहिली. आमदार बाबर यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे सांगत आमदार बाबर यांचे पुत्र अमोल व सुहास बाबर यांना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धीर दिला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी म्हणून आमदार बाबर यांचे नाव घ्यावे लागते. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले. आमच्या संघर्षाच्या काळात ते ताकदीने आमच्यासोबत उभे राहिले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांची होती. त्यांना जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातूनही लोक मंत्रालयात भेटायला येत असत त्याबाबत आम्हाला अनेक वेळा आश्चर्यही वाटायचे. आम्ही काही वेळेला परराज्यात गेलो होतो. त्यावेळीही तेथे त्यांच्या मतदारसंघातील लोक भेटायचे. त्यांचा गोतावळा हा वेगळाच राहिला.

जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गे लावा यासाठी सातत्याने धडपडत होते. पाण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यामुळेच टेंभू योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रसंगी पाणी प्रश्न सुटेपर्यंत ते कॅबिनेटच्या दारात उभे राहायचे, काही वेळेला ते प्रेमाने भांडायचे. परंतु, प्रश्न सुटल्याशिवाय मागे हटले नाहीत. माझ्या राजकीय जीवनामध्ये अधिकार वाणीने काही गोष्टी सांगत असत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनसामान्यांचे नेतृत्व हरपले

अनिल भाऊ हे जनसामान्यांचे नेते होते. सरपंच जिल्हा परिषद सदस्य ते चार वेळा आमदार झाले. या भागाची त्यांनी प्रचंड सेवा केली. दुष्काळी भागात पाणी पोचले पाहिजे, सिंचन सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, अशी त्यांची नेहमीच तळमळ असे. त्यांना मोठे पद मिळण्याची अपेक्षा होती. त्यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे. मध्यंतरी टेंभू योजनेच्या प्रशासकीय मान्यते संदर्भात ते माझ्या सतत संपर्कात होते. प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत त्यांनी पाठपुरावा सोडला नाही. टेंभू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण करणे हे त्यांचे स्वप्न होते. ते आम्ही टक्के पूर्ण करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT