Nitin Patil - Anil Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics : नितीन पाटलांची गाडी सुसाट! शरद पवारांना धक्का देत बड्या नेत्याला आणले अजितदादांच्या ताफ्यात

Satara Politics : काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यापाठोपाठ खासदार नितीन पाटील यांनी आणखी एका बड्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे.

Hrishikesh Nalagune

सातारा : काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यापाठोपाठ खासदार नितीन पाटील यांनी आणखी एका बड्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे. सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

अनिल देसाई यांनी दहिवडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यावेळी खासदार पाटीलही उपस्थिती होते. राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टीने आज हा अतिशय महत्वाचा निर्णय झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विकासात्मक तसेच राजकीय बळ देण्यात येईल याची हमी देतो असे खासदार नितीन पाटील यावेळी म्हणाले.

अनिल देसाई म्हणाले, पुढील राजकीय वाटचाली संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात आजची बैठक होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांची कामाची तसेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याची पद्धत मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून ते देतील त्या तारखेला आम्ही जाहीर प्रवेश करणार आहोत. आम्ही सर्व मिळून माण तालुका राष्ट्रवादीमय केल्याशिवाय राहणार नाही.

माण तालुक्यातील समीकरण बदलणार!

माण तालुक्यात सध्याच्या घडीला अजित पवार यांच्याकडे एकही बडा चेहरा नाही. पण अनिल देसाई यांच्या रुपाने ही उणीव भरुन निघू शकते. त्याचवेळी विद्यमान आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठीही मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. देसाई यांचे राजकारण गोरे विरोधी मानले जाते. विधानसभा निवडणुकीत प्रचारातही देसाई यांनी गोरेंवर अत्यंत कडवट शब्दात टीका केली होती. त्यामुळे आता अजित पवार यांनी अनिल देसाई यांना ताकद दिल्यास तालुक्यात दोन नेत्यांमध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT