Anil Ceshmukh, Sanjay Pande, Parambir Sinh, Salil Deshmukjh  Sarakrnama
पश्चिम महाराष्ट्र

Anil Deshmukh Vs Parambir Singh : अनिल देशमुखांचा मुलगा माझ्याकडे गयावया करीत होता, तर पांडेंनी दिल्या धमक्या; परमबीर सिंहांचा खळबळजनक दावा

Sachin Waghmare

Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अनिल देशमुख यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतापर्यंत वेगवेगळे आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले. दोघेही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

आता या वादात परवाच जेलमध्ये असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी आरोप केले. त्यानंतर आता या वादात माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांचे ही नाव आले आहे. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक ठेवण्याच्या प्रकरणात परमबीर सिंह मास्टर माईंड होते. त्यांना मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात अटक होणार होती.

त्यामुळे ते फडणवीस (Devendra Fadanvis) यांना शरण गेल्याने माझ्यावर आरोप करीत आहेत, असा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर आता परमबीर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले असून आरोपानंतर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. (Anil Deshmukh Vs Parambir Singh News)

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर का आणला जात नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी अनिल देशमुख यांनी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक ठेवण्यायात माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांचा हात असल्याचा दावा केला होता.

माझी आयएएस म्हणून प्रतिमा स्वच्छ राहिली आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख फक्त मुंबईतूनच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणावरुन वेगवेगळ्या एजंटच्या माध्यमातून वसुली करत होते. हे सर्व सीबीआय तपासातून समोर आले आहे. मी त्यांच्यावर आरोप केल्यानंतर संजय पांडे यांनी मला धमक्या दिल्या होत्या.

संजय पांडे यांनी मला म्हटले होते की, मी अनिल देशमुख यांच्या विरोधातील खटला काढला नाही तर माझ्याविरोधात खोटे गुन्हा दाखल केली जातील. मला फसवण्यात येईल. परंतु मी घाबरलो नाही. मी पूर्ण तपासाला सहकार्य केले, असल्याचे त्यांनी सांगितले.

'अनिल देशमुखसुद्धा तुमची माफी मागतील'

दरम्यान, या प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख मला वरळीमधील कॉफी शॉपमध्ये भेटले होते. त्या भेटीत सलील माझ्याकडे गयावया करु लागले. मला खटला मागे घेण्याची सारखी विनंती करत होता. माझ्या पाया पडत होता. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. हवे तर अनिल देशमुखसुद्धा तुमची माफी मागतील. तुम्हाला डीजी केले जाईल. परंतु, आपण त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळले, असे परमबीर सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

... तर सर्वांचीच नार्को टेस्ट करा

सलील देशमुख यांची भेट आरोप केल्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात झाली होती. त्यावेळी अनिल देशमुख कारागृहात गेले नव्हते. मी आता जे आरोप करत आहे, त्यातील शब्द न शब्द खरा आहे. त्यासंदर्भात नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. पण अनिल देशमुख, सलिल देशमुख आणि संजय पांडे यांचीही नार्को टेस्ट करावी, असे परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT