Congress News : 'मविआ'च्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत रमेश चेन्निथला यांची मोठी माहिती; म्हणाले,...

MVA Politics News : महाविकास आघाडीचे जागावाटप ठरवण्यापूर्वीच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत रमेश चेन्निथला यांनी मोठे विधान केले आहे.
Ramesh Chennithala
Ramesh ChennithalaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मिळलेल्या यशानंतर काँग्रेसचा कॉन्फिडस चांगलाच वाढला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. त्यामध्ये काँग्रेसने रणनीती आखात आतापासूनच कंबर कसली आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरवण्यापूर्वीच त्यांनी रविवारी बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या (Congress) दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर बोलताना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत रमेश चेन्निथला यांनी मोठे विधान केले आहे. (Congress News)

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक रविवारी मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना येत्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.

त्यासोबतच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून ठरलेला नाही. त्याबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर तीन पक्ष एकत्रित बसून घेतील, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपाबाबत 7 ऑगस्टला मुंबईत आघाडीची बैठक होणार आहे. त्यामध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्ग्ज मंडळी उपस्थित होते

Ramesh Chennithala
Pune Congress : पुण्याचा शहराध्यक्ष बदलाची खलबतं दिल्लीत; अरविंद शिंदेंना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी, बागवेंची थेट खर्गेंकडे धाव

या बैठकीत काँग्रेसच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरली आहे. जागावाटपाच्या बैठकीत किती जागावर काँग्रेस दावा करणार याबाबतही बैठकीत ठरले आहे. त्यानुसार काँग्रेस आघाडीच्या बैठकीत जागांची मागणी करणार असल्याचे समजते.

दरम्यान, काँग्रेसच्या या बैठकीस ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे वरूण सरदेसाई यांनी या बैठकीवेळी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याने वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Ramesh Chennithala
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना घरातूनच धक्का बसण्याची शक्यता; नातलग विधानसभा निवडणूक लढणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com