anna hajare
anna hajare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अण्णा हजारे म्हणाले, हा विजय विरोधकांचा नसून शेतकऱ्यांचा...

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही उभे केले होते. अखेर केंद्रातील भाजप सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. Anna Hazare said, this victory is not of the opposition but of the farmers ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन तीन कृषी कायदांचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विरोधकांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केले आहे. या परिस्थितीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केले आहे.

अण्णा हजारे म्हणाले, कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतल्याची बातमी ऐकली. याचा आनंद झाला असून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी हजारे पुढे म्हणाले की, हा विजय विरोधी पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आहे आणि देशाला आंदोलन करून यश मिळवण्याचा मोठा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेबाबत नंतर राज्याच्या विविध घटकातून प्रतिक्रिया येत आहेत. कृषी प्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळत त्यासाठी उत्पन्नावर आधारित भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी देखील हजारे यांनी यावेळी केली.

कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. कारण शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. तो जगाचा पोशिंदा आहे.

- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT