Nitesh Rane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane On Love Jihad : धर्मांतरविरोधी कायद्याबाबत नितेश राणेंची मोठी माहिती; म्हणाले, "कुठल्याही क्षणी..."

Rahuri Hindu March : राहुरी शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे येथील मुलींवर बळजबरीने धर्मांतर प्रकरणानंतर शनिवारी राहुरी शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरणावर प्रतिबंध आणण्यासाठी केलेल्या कायद्याबाबत मोठी माहिती दिली. धर्मांतर विरोधी कायदा लवकरच कोणत्याही क्षणी येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Latest Political News)

राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात काही मुलींना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी झाल्याच्या तक्रारी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुलींना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तरुणांवरही पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप होत आहे. यातून दोन्ही समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राहुरीत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चात खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डीले आदी जिल्ह्यातील नेते सहभागी झाले होते. मोर्चा आणि सभा पार पडल्यानंतर नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कायद्याबाबत माहिती दिली. यावेळी राणेंनी लवकरच धर्मांतरबंदी कायदा येणार असल्याचे स्पष्ट केले. धर्मांतर कायद्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून पुढे येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा होईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Crowd in March

यावेळी आमदार नितेश राणेंनी सांगितले, धर्मांतरबंदी कायद्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच कुठल्याही क्षणी कायदा होणार आहे. पुढील अधिवेशनात हा कायदा नक्की होईल. तसेच लव्ह जिहाद कायदाही येईल", असेही राणेंनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राणेंनी काँग्रेसवरही सडकून टीका केली.

काँग्रेस सरकार असते त्यावेळी हिंदूंना मोकळीक नसते असा आरोप राणेंनी केला आहे. ते म्हणाले "देशात हिंदू बहुसंख्य असल्याने आपला देश हिंदू राष्ट्रच आहे. पण सध्या एक षडयंत्र सुरू असून लव्ह जिहाद, लँड जिहादच्या माध्यमातून धर्मांतरे होत आहेत. हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आता सत्तेत हिंदू विचारांचे सरकार असून हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे", असा विश्वासही राणेंनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT