राहुल गडकर -
Kolhapur News : कार्यालयात गेल्यानंतर नेहमी हसरा चेहरा, तोंडात साखर ठेवून गोड बोलून मनं जिंकू पाहणारे कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचा गोडवा लाखाच्या लाचेने संपवला आहे. मंजूर टेंडरचे बिल काढण्यासाठी एक लाख दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना साखरे लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहाथ पकडले गेले.
क्रीडा कार्यालयातच ही कारवाई झाल्याने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची(Anti Corruption Bureau) अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे. एसीबीकडून मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर(Kolhapur) जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी ऑनलाइन महाटेंडरवर अर्ज करून कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक साहित्य पुरवले होते.
या साहित्याचे एकूण बिल 8 लाख 89 हजार 200 झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे बिल रकमेच्या 15 टक्के रक्कम लाच स्वरूपात मागितली होती. तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपये इतकी ठरली. तक्रारदार यांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.(Latest Marathi News)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सापळा लावला. आरोपी साखरे यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपीविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.