Nanded Incident : डीनला ही शिक्षा देता, मग आरोग्य मंत्र्यांना जाब विचारणार का?; कोल्हेंचा हेमंत पाटलांना सवाल

Amol Kolhe To Hemant Patil : खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना शौचालय स्वच्छ करायला लावले आहे.
Hemant Patil-Tanaji Sawant-Amol Kolhe
Hemant Patil-Tanaji Sawant-Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत गेल्या ३६ तासांमध्ये ३१ रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. त्यात १२ बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून राजकारणही सुरू झालं आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना शौचालय स्वच्छ करायला लावले आहे. त्याचा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला असून, ‘चोर सोडून संन्याशाला फाशी,’ असा हा प्रकार आहे. डीनला ही शिक्षा, तर आरोग्यमंत्र्यांना जाब विचारणार का, असा खडा सवाल केला आहे. (Amol Kolhe asked a question to Hemant Patil)

Hemant Patil-Tanaji Sawant-Amol Kolhe
Rajan Patil News : ‘राजन पाटलांना मानावेच लागेल; कारण...’ : रमेश कदमांनी केले कौतुक

या दुर्घटनेनंतर हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. त्यावेळी त्यांना काही स्वच्छतागृहे बंद झाली. अनेक स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड घाण दिसली. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी हातात पाण्याचा पाइप घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाच शौचालय स्वच्छ करायला लावले. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

हेमंत पाटील यांच्या केलेल्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड रुग्णालयातील अधिष्ठाता यांना शौचालय स्वच्छ करायला लावणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार आहे. जर डीनला ही शिक्षा, तर सार्वजनिक आरोग्य विभाग हाताळणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार की, स्वपक्षीय म्हणून काणाडोळा करणार? असा सवाल केला आहे.

Hemant Patil-Tanaji Sawant-Amol Kolhe
Nitin Gadkari News : 'गडकरीसाहेब, सोलापूर-उमरगा रस्त्याच्या काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली कधी टाकणार?'

जनतेच्या कराच्या कोट्यवधी रुपयांची जाहिरातींवर उधळपट्टी करण्यापेक्षा डॉक्टरांची कमतरता, औषधांचा पुरवठा, तंत्रसामग्रीची पूर्तता कोणी करायला हवी? ठाणे, नांदेड आणि आता छत्रपती संभाजीनगर येथे झालेले रुग्णालयातील मृत्यू वेदनादायक आहेत आणि कोविड काळात तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेने देशात मान उंचावली होती, त्या महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असे आचके देऊ लागली तर जबाबदारी कुणाची?

Hemant Patil-Tanaji Sawant-Amol Kolhe
Dada Vs Saheb : साहेबांच्या दोन दौऱ्यांची धास्ती, अजितदादांची अस्वस्थ राष्ट्रवादी...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com