Appasaheb Nalawade Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : 'गोड'साखरेत 'कडू'पणा, आप्पासाहेब नलवडे कारखान्याच्या 6 संचालकांचे 'खटाखट' राजीनामे; कारण काय?

Rahul Gadkar

Appasaheb Nalawade Sugar Factory Gadhinglaj : गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या अर्थात 'गोड'साखर कारखान्याच्या 'कडू' कहाण्या दिवसेंदिवस समोर येत आहेत. दिवसेंदिवस कारखाना प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत आहे.

त्यातच कारखानाच्या संचालकांनी मोठा निर्णय घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या मनमानी एकाधिकारशाहीला कंटाळून सहा संचालकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सहा संचालक आज आपले राजीनामे पालकमंत्री हसीन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन अध्यक्षांच्या नावे असलेले लेखी राजीनामे पहिल्यांदा आघाडीप्रमुख या नात्याने मुश्रीफ यांच्याकडे देणार आहेत.

राजीनामे देणाऱ्यांमध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, अशोक मेंडुले व अक्षयकुमार पाटील यांचा समावेश आहे. अध्यक्ष प्रकाश शहापूर यांच्याकडून कर्जाच्या रकमेचा दुरूपयोग सुरू आहे.

संचालकांना विश्वासात न घेता शहापूरकरांची एकाधिकारशाही सुरू आहे. आघाडीचे नेते मुश्रीफ यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे तक्रार करून ही कारभार सुधारलेला नाही. त्यामुळे आम्ही राजीनामे देत आहोत, अशी भूमिका संचालकांनी घेतली.

गतवर्षी कारखाना वेळेत सुरू न झाल्याने 25 कोटींचा तोटा झाला. इथेनॉल प्रकल्पाला केंद्र सरकारची परवानगी नसताना आणि बोर्डीची मंजूर न घेता कंत्राटदाराला साडेचार कोटी देण्यात आले. सहकार नियमांचा अवलंब न करतात खरेदी प्रक्रिया राबविली.

सहकार नियमांचा अवलंब न करता खरेदी प्रक्रिया राबविली. दुरुस्तीचे काम निकृष्ठ झाले. त्याचा परिणाम झाला. उलट अध्यक्षांनी त्याचे खापर कामगारांवरच फोडले. महत्वाचे विषय संचालक मंडळासमोर येत नाहीत, आम्ही केलेल्या तक्रारींची चौकशीसाठी दखल घेतली जात नाही. एकप्रकारे अध्यक्षांनी मनमानी कारभार सुरु ठेवला आहे. त्यात सुधारणा होतं नसल्याने आम्ही राजीनामा देत असल्याचे संचालकांनी सांगितले.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT