Sangola Politics : सांगोल्यात पुन्हा रंगणार भाऊबंदकी...; शहाजीबापूंना डॉ. अनिकेत की बाबासाहेब टक्कर देणार?

Dr. Aniket Deshmukh-Babasaheb Deshmukh : डॉ. अनिकेत देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केल्यानंतर गेली पाच वर्षे विधानसभेची तयारी करणारे त्यांचे चुलत बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भूमिका काय असणार, हेही महत्त्वाचे आहे.
Dr. Aniket Deshmukh-Babasaheb Deshmukh
Dr. Aniket Deshmukh-Babasaheb DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 July : सांगोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाऊबंदकी रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण, सांगोला मतदारसंघातून डॉ. अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. (स्व.) गणपतराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. अनिकेत देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केल्यानंतर गेली पाच वर्षे विधानसभेची तयारी करणारे त्यांचे चुलत बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भूमिका काय असणार, हेही महत्त्वाचे आहे. कारण, डॉ. बाबासाहेबही गेली पाच वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत. शेकापच्या तिकिटासाठी दोन भावांमध्ये राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत सांगोल्यात (Sangola) शेकापच्या (PWP) दोन भावांमधील मतभेद महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. सांगोल्यात गेल्या पाच वर्षांत डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांनी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला खरेदी विक्री संघ या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करत सहकारात पक्षाचे एकहाती वर्चस्व राखले आहे.

पक्षीय संघटनेतही बाबासाहेबांचा शब्द महत्वाचा मानला जातो. अगदी शेकापचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यापासून तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत बाबासाहेब देशमुख यांचा संपर्क राहिलेला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केली आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या उमेदवाराचे प्रमुख दावेदार मानले जातात.

एकीकडे गेली पाच वर्षांपासून काम करणारे डॉ. बाबासाहेब देशमुख, तर दुसरीकडे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. (स्व) गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे अनिकेत यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे शेकापकडून कोणाला तिकीट मिळते आणि आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Dr. Aniket Deshmukh-Babasaheb Deshmukh
Jitesh Antapurkar : क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली भाजप नेत्याची भेट

दरम्यान. डॉ. अनिकेत देशमुख हे माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठीही इच्छुक होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, शरद पवार यांच्या भेटीनंतर डॉ. अनिकेत यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. आता विधानसभेसाठी त्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. त्यामुळे डॉ. अनिकेत हे खरंच विधानसभा निवडणूक लढविणार की या वेळी आपले बंधू डॉ.बाबासाहेब देशमुख यांना संधी देणार, याकडे सांगोल्याचे लक्ष असणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत आमदार गणपतराव देशमुख यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत अनिकेत देशमुख यांचा शहाजी पाटील यांच्याकडून अवघ्या 786 मतांनी पराभव झाला होता, त्यामुळे अनिकेत यांनी पुन्हा एकदा शेकापच्या उमेदवारीवर दावा केला आहे.

मागील निवडणुकीत गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला विधानसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले होते. जनतेच्या आग्रहास्तव मी शिक्षण अर्धवट सोडून आबासाहेबांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढविण्यचा आदेश आबासाहेबांनी दिला होता. यावेळी त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका डॉ. अनिकेत देशमुख यांनी मांडली आहे.

Dr. Aniket Deshmukh-Babasaheb Deshmukh
Ranjitshinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कुणाचे? भाजप की विधानसभेला नवा डाव टाकणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com