Ram Satpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha : सोलापुरात आमदार राम सातपुते अन्‌ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Lok sabha Election 2024 : राम सातपुते यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे समोरासमोर आल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मतदान नसताना काही तरुण मतदान केंद्रावर फिरत असल्याचा आक्षेप आमदार राम सातपुते यांनी घेतला होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 May : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सोलापूर शहरात दुपारी बाचाबाची झाली. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला, त्यानंतर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सातपासून चुरशीने मतदान झाले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी झाली होती. आमदार राम सातपुते यांनीही सकाळीच मतदान करून मतदान केंद्राची पाहणी केली. सोलापूर शहरातील बेगम पेठ येथील महापालिकेच्या उर्दू शाळेत सातपुते आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम सातपुते यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे समोरासमोर आल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मतदान नसताना काही तरुण मतदान केंद्रावर फिरत असल्याचा आक्षेप आमदार राम सातपुते यांनी घेतला होता. आमदार राम सातपुते हे मतदान केंद्रावर येऊन मतदारांना प्रभावित करत आहेत, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही गटात बाचाबाची झाली.

त्याच कारणावरून आमदार सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात पाठविले. दुसरीकडे पाेलिसांनी गर्दीला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही.

दरम्यान, सायंकाळी पाचपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी 49.85 टक्के मतदान झाले आहे. दुपारी चारनंतर मतदानासाठी रांगा लागल्याने सायंकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT