Solapur, 14 August : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे ‘शिवरत्न’ हे हटवून ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा निर्णय पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या भाजपने घेतला आहे. त्यावरून मोठे वादंग उभे राहिलेले असतानाच त्या वादात अखेर मोहिते पाटील यांची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणावर मोहिते पाटील यांच्याकडून प्रथमच भाष्य करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सभागृहाचे नाव हटवून त्याला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा ठराव मांडला होता. त्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली होती.
त्या सभेत सभागृहाचे नाव बदलण्याचा ठरावाचा प्रश्र उपस्थित होताच प्रशासनाकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले. जिल्हा परिषदेकडून हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, त्या ठिकाणी सरकार जो काही निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, या वादात मोहिते पाटील कुटुंबाकडून प्रथमच भाष्य करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अर्जूनसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया देताना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही.
ते म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देत असताना विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी नवीन कुठली इमारत उभी केली असती, वाचनालय, ग्रंथालय किंवा शेतकरी निवासस्थान असेल अशा गोष्टींसाठी इमारत उभी करून तिला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिलं असतं तर सर्वांना आनंद झाला असता आणि कुणाची मनंही दुःखावली नसती.
जुन्या सदस्यांनी आणि नेतेमंडळींनी एका भावनेतून हे नाव सभागृहाला दिलेले आहे, त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी हे नाव कायम ठेवून दुसरीकडील सभागृहाला वाजपेयी यांचं नाव दिलं तर आम्हाला निश्चितच आनंद होईल, अशी भावना अर्जूनसिंह मोहिते पाटील यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.