Jyoti Mete: विनायक मेटेंच्या मृत्यूला 4 वर्षे! ज्योती मेटेंचा चालकावर पुन्हा संशय, म्हणाल्या- ‘पैशांची कारंजी कुठून?’

Vinayak Mete Death Case Update: डॉ. ज्योती मेटे यांनी प्रकरणातील ढिसाळ न्यायालयीन प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केला. न्यायालयीन विलंबावर बोट ठेवत, चालकावर पुन्हा एकदा थेट संशय व्यक्त केला आहे.
Vinayak Mete Death Case Update
Vinayak Mete Death Case UpdateSarkarnama
Published on
Updated on

Beed politics: शिवसंग्रामचे संस्थापक आणि लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाला चार वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्यांच्या मृत्यूभोवतीचा संशयाचा धुरळा अजूनही खाली बसलेला नाही. बीड येथील स्मृतीस्थळावर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी अपघात प्रकरणातील न्यायालयीन विलंबावर बोट ठेवत, चालकावर पुन्हा एकदा थेट संशय व्यक्त केला आहे.

डॉ. ज्योती मेटे यांनी प्रकरणातील ढिसाळ न्यायालयीन प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केला. अपघातातील चालक एकनाथ कदमवर आमचा सुरुवातीपासूनच संशय आहे. मात्र, संबंधित आरोपी न्यायालयात प्रत्येक तारखेला वारंवार गैरहजर राहत असल्याने या प्रकरणात अद्याप चार्ज फ्रेम (आरोप निश्चिती) देखील झालेला नाही.

आम्ही आमचा माणूस गमावला, आमचे पूर्ण भविष्य उद्ध्वस्त झाले. पण या प्रकरणाकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे. संशयित चालकाच्या आर्थिक स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करत डॉ. मेटे यांनी धक्कादायक दावा केला. अपघातातील चालक आज सामाजिक जीवनात उजळ माथ्याने आणि सक्रियपणे वावरत आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्या आणि बैलगाडा शर्यतींसारख्या महागड्या शौकासाठी पैसा नेमका कुठून येतो?

Vinayak Mete Death Case Update
IPS Rupa Moudgil: तुकाराम मुंढेंपेक्षाही चर्चेत ‘लेडी सिंघम’! 20 वर्षांत 40 बदल्या थेट मुख्यमंत्र्यांवर केली होती कारवाई

यामागील अदृश्य हातांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ज्योती मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली. विनायक मेटेंच्या पश्चात्य महायुती सरकारमध्ये शिवसंग्राम पक्षाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना कोणताही अपेक्षित राजकीय वाटा मिळालेला नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. ​

Vinayak Mete Death Case Update
EPS-95 Pension Update: किमान पेन्शन 7 हजार 500 रुपये होणार? सरकारने लोकसभेत काय सांगितलं?

या संपूर्ण प्रकरणातील न्यायालयीन विलंब, चालकाची संशयास्पद पार्श्वभूमी आणि पक्षाची उपेक्षा यावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com