Arun Dongle Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Arun Dongle : गोकुळ अध्यक्षांची विधान परिषदेची चर्चा, हवेत बार की भावनेवर स्वार?

President of Gokul Dudh Sangh Arun Dongle : गोकूळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजकीय बढतीच्या चर्चा सध्या जिल्ह्यात रंगल्या आहेत. त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले जाईल, असे म्हटले जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडली. केंद्रात भाजपचे सरकार आले तर राज्यात महायुतीचे सरकार आले. या दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. कार्यकर्त्यांचे हवेत बार सुरू झाले आहेत. आता त्यावर नेतेही स्वार झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर डोंगळे राज्यसभेसाठी हालचाल करत आहेत, अशी चर्चा केवळ हवेत रंगली होती. तर आता गोकुळच्या स्टेजवरच विधान परिषदेची चर्चा रंगली आहे. खुद्द नेत्यांनीच याचा दाखला दिल्याने जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघांच्या वतीने जिल्ह्यातील खासदार आणि मंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. त्यांना विधान परिषदेचे वेध लागले असल्याने ते अभ्यास दौऱ्याला जाणार नाहीत अशी माहिती आमदार पाटील यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांचा चिमटा काढत डोंगळे हे परदेश दौऱ्याला का जाणार नाहीत? याचे कोडे पडले असल्याचे सांगितले.

एकंदरीतच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एक संघ लढलेले आमदार पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे राज्यातील सत्तेत एकमेकांच्या विरोधात आहेत. शिवाय अध्यक्ष डोंगळे यांनी देखील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार केला. त्यांनी नेमकी ही भूमिका का घेतली? याचे उत्तर डोंगळे यांच्याकडेच आहे.

राधानगरीतील उमेदवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांना डोंगळे यांनी पाठिंबा देत बळ दिले होते. मात्र या पाठिंब्या मागे कोणता शब्द दडला आहे का? याचा शोध घ्यावा लागणार आहे. गोकुळच्या व्यासपीठावरून झालेल्या वक्तव्यामुळे याची शंका अधिक गडद झाली आहे.

दरम्यान याच कार्यक्रमात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कळ काढली होती. तर याच कार्यक्रमात मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर बोलत जोरदार बॅटींग केली होती. यामुळे या कार्यक्रमात जिल्ह्यातील विरोधकांमध्ये हास्य विनोद पाहायला मिळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT