Gokul Dudh Sangh : मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरच 'गोकुळ'चं राजकीय भवितव्य अवलंबून!

Gokul Milk Association Politics : गोकुळ संघ ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे.
Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh
Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak SanghSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र असलेल्या 'गोकुळ'चे भवितव्य कोणाला मंत्रिपद मिळणार यावरच ठरणार आहे. गोकुळ संघ ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांनी सहकारातील दोस्ती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केल्यानंतर पाच सत्ता अबाधित राहील असे संकेत आहेत. मात्र मंत्रिमंडळात शिवसेना भाजपमधून कोण मंत्री होणार यावरच गोकुळची सत्ता राहणार की नाही हे समजणार आहे. ज्याच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल, त्यावरच संघाचे राजकीय गणित अवलंबून आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांची गोकुळ दूध संघामध्ये सत्ता होती. मात्र या सत्तेला आमदार सतेज पाटील(Satej Patil) आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, माजी खासदार, आमदार चंद्रदीप नरके, यांनी एकत्र येत सुरुंग लावला. गोकुळ दूध संघाला मल्टीस्टेट करण्याच्या मुद्द्यांवरून हे सर्व एकत्र आले. 2019 ला गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आणि काँग्रेसकडून सतेज पाटील यांची मंत्रिमंडळात वर्दी लागली. त्याचा फायदा त्यांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत झाला.

Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh
Dhavalsingh Mohite Patil : खासदार ताईंच्या 'अ‍ॅटिट्यूड'मुळे विधानसभेला 'हाता'त भोपळा; जिल्हाध्यक्षांनीही 'बाण' सोडले

तीन वर्षाच्या काळात गोकुळ(Gokul) मधील अनेक मुद्दे विरोधकांनी समोर आणले आहेत. जिल्ह्यात अंदाजे एक हजार नवीन दूध संस्थांची नोंदणीसाठी मागणी आहे. मात्र या नोंदी राज्यातील बड्या नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर थांबवण्यात आल्या. कारण तीनशे भर दूध संस्था नोंद झाल्यास निवडणुकीत सत्तेच्या चाव्या या सभासदांच्या नेत्यांकडेच राहू शकतात. शिवाय विरोधकांनी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर त्याचा अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. लेखा परीक्षणाचा मुद्दा हा अडचणीचा होऊ नये यासाठी गोकुळच्या कारभाऱ्यांचा प्रयत्न राहील. याच मुद्द्यावर गोकुळ संघावर प्रशासक आणण्याच्या हालचाली विरोधक देखील करू शकतात.

Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh
Prashant Kishor: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा 'असा' आहे प्रवास!

एकंदरीतच पाहता राज्य मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) आणि आमदार विनय कोरे यांची वर्णी लागली तर गोकुळ मध्ये सत्ताधारी हे पाच वर्षे पूर्ण करतील. असाच अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक मतदार संघात केलेला हस्तक्षेप अनेक विद्यमान आमदारांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आगामी काळात या सर्व आमदारांची भूमिका गोकुळ मध्ये विरोधात जाऊ शकते. असाही राजकीय अंदाज आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात राज्य मंत्रिमंडळात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणारत यावरच गोकुळचे राजकीय गणित अवलंबून आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com